एक्स्प्लोर
Advertisement
जेव्हा नाथाभाऊ 'महाजनां'ना आत्महत्येपासून परावृत्त करतात!
भाजपच्या दुसऱ्या यादितही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव आलेलं नाही. त्यामुळे आता खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा धीरही सुटू लागला आहे. त्यातच आज मुक्ताईनगरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात, खडसेंचा एक कार्यकर्ता आत्महत्या करण्याचा विचार करतोय, ही वार्ता पसरली. अखेर फोनाफोनी करून खुद्द एकनाथ खडसेंना या कार्यकर्त्याची समजूत काढावी लागली.
जळगाव: "नाथाभाऊ, तुम्हाला तिकिट मिळत नाही. हे काही बरोबर नाही. मी रॉकेल ओतून घेणार", अशा शब्दात एकनाथ खडसेंच्या एका कार्यकर्त्यानं आपली वेदना फोनवर बोलून दाखवली. मात्र, प्रसंगाचं गांभीर्य ओळखून खडसेंनी त्याची समजून काढली आणि पक्ष-संघटनेचा आदेश पाळण्याच्या शिस्तीची आठवण करून दिली. अखेर, खडसेंच्या आपुलकीच्या समजावणीमुळे तो कार्यकर्ता शांत झाला. मात्र, तोपर्यंत एकनाथ खडसेंच्या समर्थनासाठी भरलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात तणावाचं वातावरण होतं.
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची दुसरी यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, अजूनही एकनाथ खडसे, विनोद तावडे अशा काही वरिष्ठ नेत्यांची नावं जाहीर झालेली नाहीत. खासकरून महायुतीच्या सत्तेच्या या टर्ममध्ये खडसे सत्ताधारी पक्षात असूनही विजनवास भोगत होते. मात्र, किमान विधीमंडळात तरी खडसेंचं अस्तित्व जाणवत असे. त्यांची स्वपक्षीय आणि विरोधकांवरची टीका बातम्यांचा विषय असे. भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही एकाही प्रकरणात त्यांच्याविरूद्ध भक्कम पुरावे आढळलेले नाहीत. आपली चौकशी पूर्ण करा, असा आग्रह स्वत: खडसे यांनीच अनेकदा धरला. विधीमंडळाचा हा कार्यकाळ संपत असताना उद्विग्न होऊन त्यांनी स्वत:लाच दोषही दिले. तरीही, किमान यंदाच्या निवडणुकीत खडसेंना नव्यानं संधी दिली जाईल, अशी त्यांच्यासह त्यांच्या पाठिराख्यांनाही आशा होती.
मात्र, अजूनही त्यांचं तिकिट जाहीर न झाल्यानं कार्यकर्त्यांच्या संयमाचा बांध फुटला. अखेर आज मुक्ताईनगरात त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन खडसे यांना अपक्ष उभं राहण्याची गळ घातली. कार्यकर्त्यांची भाषणं सुरू असतानाच, कुणी नाना महाजन हे कार्यकर्ते आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची बातमी पसरली. खडसेंना याची लगेचच माहिती देण्यात आली. थोड्याच वेळात नाना महाजन यांचा फोन खडसेंना जोडून देण्यात आला. खडसेंनी त्यांची समजूत काढली. आपण संघाचे स्वयंसेवक आहोत. पक्षाची शिस्त पाळली पाहिजे. वरिष्ठांनी काही विचार करूनच निर्णय घेतला असेल. असं खडसे म्हणाले. यानंतर तो कार्यकर्ता शांत झाला.
खडसेंनी अजून बंडाचा झेंडा थेटपणे खांद्यावर घेतला नसला तरी यापूर्वीच त्यांनी मुहूर्त पाहून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.
संबंधित बातम्या:
सदस्यत्वाचा फॉर्म भरुन नितेश राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, नारायण राणेंबाबत सस्पेन्स कायम
भाजपची दुसरी यादी जाहीर, खडसे, तावडे, बावनकुळे यांचं नाव नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement