एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 23 तारखेची वाट बघा...

Devendra Fadnavis: मुख्यमंत्रि‍पदाबाबत आम्ही ठरवलं आहे. जो काही निर्णय होईल तो निकालानंतर होईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Devendra Fadnavis Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की शरद पवार (Sharad Pawar), कोणासाठी दरवाजे उघडणार?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर कुणाची गरज लागणार नाही, आम्ही तिघेच पुरेसे आहोत, तशी परिस्थितीची येणारच नाही...23 तारखेची वाट बघा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला आम्ही निकालानंतर ठरवू. सरकार म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचा चेहरा आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्रि‍पदाबाबत आम्ही ठरवलं आहे. जो काही निर्णय होईल तो निकालानंतर होईल. रोटेशनल मुख्यमंत्री अशी कोणतीही अट एकनाथ शिंदे यांनी ठेवली नाहीय, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

नवाब मलिकांबाबत आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं- देवेंद्र फडणवीस

महायुतीमध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिल्यानं विरोधकांकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही. नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका, हे आम्ही अजित पवारांना सांगितलं होतं. मात्र अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला. अजित पवारांनी असं का केलं, हे तेच सांगू शकतात, त्यांना विचारा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवलं- देवेंद्र फडणवीस

आमच्या हिंदुत्वाबद्दल बोलायची गरज नाही. स्वर्गीय बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवलं. आदित्य ना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही बरोबर आहे, कारण त्यांना शिकवण्यासाठी अबू आझमी आहेत. बाळासाहेबांना जनाब म्हटलं जातं, जे हिंदुत्व बाळासाहेबांचे होते, शिवसेनेचे होते ते हिंदुत्व  उद्धव ठाकरेंनी संपवलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. तसेच ना मला ठाकरे संपवू शकतात, ना मी त्यांना संपवू शकत. कोणाला संपवायचं हे जनता ठरवते, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

आम्हाला फेक नेरेटीव्हने हरवलं-

लोकसभेत तीन पक्षांनी आम्हाला हरवलं नाही. आम्हाला फेक नेरेटीव्हने हरवलं. तीन पक्ष आम्हाला हरवू शकलेच नसते. फेक नेरेटीव्ह कंट्रोल करण्यात आम्ही कमी पडलो. त्याचं आकलन नीट करु शकलो नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतून आम्हाला चांगला अनुभव मिळाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

संबंधित बातमी:

Ajit Pawar: शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या जिव्हारी लागली; म्हणाले, प्रगल्भ नेत्याला असली कृती शोभत नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
धक्कादायक! बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
धक्कादायक! बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 
कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 
रुपया घसरला, पेट्रोल डिझेल, औषधं अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार, महागाईचा चटका बसणार?
रुपया घसरला, पेट्रोल डिझेल, औषधं अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार, महागाईचा चटका बसणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pruthviraj Mohol Maharashtra Kesri| पंचांची आज्ञा ही देवाज्ञा असते, मारहाण झाली हे चुकीचंABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 03 February 2024 सकाळी 01 PM च्या हेडलाईन्सShivraj Rakshe Exclusive Interview : दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाली म्हणून टोकाचं पाऊल उचललंABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 03 February 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
धक्कादायक! बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
धक्कादायक! बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 
कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराज राक्षेच्या कृत्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया 
रुपया घसरला, पेट्रोल डिझेल, औषधं अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार, महागाईचा चटका बसणार?
रुपया घसरला, पेट्रोल डिझेल, औषधं अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार, महागाईचा चटका बसणार?
Abhishek Sharma : वानखेडेवर इंग्रजांना धावांचा 'अभिषेक' घालताच फ्लाईंग किस सेलिब्रेशन, पण ती स्पेशल व्यक्ती कोण? विक्रमवीर अभिषेक शर्मानं केला खुलासा!
वानखेडेवर इंग्रजांना धावांचा 'अभिषेक' घालताच फ्लाईंग किस सेलिब्रेशन, पण ती स्पेशल व्यक्ती कोण? विक्रमवीर अभिषेक शर्मानं केला खुलासा!
Shivraj Rakshe Exclusive Interview : दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाली म्हणून टोकाचं पाऊल उचललं
Shivraj Rakshe Exclusive Interview : दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाली म्हणून टोकाचं पाऊल उचललं
Pruthviraj Mohol : माझ्यासोबतही गेल्यावेळी अन्याय, पण मी हार न मानता जिंकून दाखवलं, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळची वादावर पहिली प्रतिक्रिया!
माझ्यासोबतही गेल्यावेळी अन्याय, पण मी हार न मानता जिंकून दाखवलं, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळची वादावर पहिली प्रतिक्रिया!
Abhishek Sharma : मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मारलेल्या सिक्सपैकी जास्त सिक्स अभिषेकने फक्त दोन तासात मारले! माजी इंग्लंड कॅप्टनची बोलती सपशेल बंद
मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मारलेल्या सिक्सपैकी जास्त सिक्स अभिषेकने फक्त दोन तासात मारले! माजी इंग्लंड कॅप्टनची बोलती सपशेल बंद
Embed widget