Devendra Fadnavis Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदाच्या सर्वात पॉवरफुल खुर्चीवर बसणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना किती पगार मिळणार? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक पगार?
Devendra Fadnavis Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसांना प्रति महिना किती पगार मिळणार?, याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
Devendra Fadnavis Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Oath Ceremony) आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून कालपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर काल देवेंद्र फडणवीसांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. याचदरम्यान एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती वेतन मिळतं?, देवेंद्र फडणवीसांना प्रति महिना किती पगार मिळणार?, याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा पगार किती असेल?
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेळोवेळी सुधारित केले जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आता 3.4 लाख रुपये प्रति महिना झाले आहे. यापूर्वी 2016 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन दरमहा 2.25 लाख रुपये होते. मुख्यमंत्र्यांना घर, गाडी, वीज, फोन, प्रवास अशा सुविधा मिळतात. त्यांना सर्वाधिक सुरक्षा मिळते. तथापि, या सुविधा राज्यानुसार बदलतात.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिक वेतन-
राज्य विधिमंडळाने मुख्यमंत्र्यांसाठी पगारासह अनेक भत्ते निश्चित केले आहेत. यामध्ये महागाई तसेच इतर अनेक भत्त्यांचा समावेश आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांना निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आदी मोफत मिळतात. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा 4.10 लाख रुपये दिले जातात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 3.90 लाख रुपये, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 3.65 लाख रुपये, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 3.35 लाख रुपये, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना 3.21 लाख रुपये, हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 3.10 लाख रुपये देण्यात आले आहेत.
हरियाणा-बिहारसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन
याशिवाय हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना 2.88 लाख रुपये, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना 2.55 लाख रुपये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना 2.30 लाख रुपये, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना 2.20 लाख रुपये, 2.15 रुपये देण्यात आले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लाख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा 2.10 लाख रुपये. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना 2.05 लाख रुपये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना 2 लाख रुपये, सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांना 1.9 लाख रुपये आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना 1.6 लाख रुपये वेतन दिले जाते. मुख्यमंत्र्यांच्या पगाराचा केंद्र सरकार किंवा संसदेशी काहीही संबंध नाही.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)
- महायुती- 237
- मविआ- 49
- अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
एकूण 288
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137