एक्स्प्लोर

बबनदादा, संजयमामा, परिचारक  ते कल्याणराव, माढ्यात मोहिते पाटलांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांचा प्लॅन! 

कोणत्याही परिस्थितीत माढा जिकांयचाच या दृष्टीनं देवेंद्र फडणवीसांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केलीय.  मोहिते पाटील जाणार हे गृहीत धरुन देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेसाठी घेतली खास बैठक घेतली.

Madha Loksabha Election : माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपने (BJP) इथून पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशातच कोणत्याही परिस्थितीत माढा जिकांयचाच या दृष्टीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केलीय.  मोहिते पाटील जाणार हे गृहीत धरुन देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेसाठी घेतली खास बैठक घेतली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बोलावलेल्या या बैठकीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परिवार भाजपाला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत आहेत.  हा मतदारसंघ राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सध्या बैठकांचा सपाट लावला आहे. कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे . या सर्व घडामोडीचे केंद्र सागर बंगला झाला असून माळशिरस येथील मोहिते विरोधकांची बैठक घेऊन मोट बांधल्यानंतर आता मतदारसंघातील इतर आमदार आणि प्रतिनिधींची बैठकही फडणवीस यांनी घेतली आहे.

शिंदे बंधुंनी विधानसभेप्रमाणे तयारी करुन लोकसभेला लीड द्यावा

माढा आणि करमाळा येथील आमदार असणारे शिंदे बंधू आणि मोहिते पाटील यांचे वैमनस्य जगजाहीर आहे. लोकसभेनंतर विधानसभेलाही शिंदे बंधूनी मोहिते पाटील यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही शिंदे बंधुंनी विधानसभेप्रमाणे तयारी करून महायुतीला जास्तीत जास्त लीड देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावे असून येथे वर्चस्व असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांनाही मताधिक्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सांगोला मतदारसंघात खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाण्याच्या मोठ्या योजना मार्गी लावल्याने सांगोल्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न होणार आहे. याशिवाय माण खटाव आणि फलटण या दोन तालुक्यातून निर्णायक आघाडी घेण्यासंदर्भात सूचना आणि व्यूहरचना आखण्यात आली आहे.

रामराजे निंबाळकर काय भूमिका घेणार?

दरम्यान, फलटण येथील रामराजे निंबाळकर आणि त्यांचे समर्थक काय भूमिका घेणार यावर येथील मताधिक्य अवलंबून असले तरी मोहिते पाटील यांच्या शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीवर तोडगा काढून गेल्यावेळीपेक्षा जास्त मताधिक्याने माढा लोकसभा जिंकण्याचा कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आता फलटणमधून रामराजे निंबाळकर कोणती भूमिका घेणार यावर भाजप लक्ष ठेवून आहे. याबाबत अजित पवार यांनाही योग्य तो निरोप देण्यात आला आहे. भाजपने सुरुवातीपासून एक तर सोबत नाहीतर विरोधी अशी स्पष्ट भूमिका घेण्याबाबत मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर याना सूचना दिल्या होत्या. आता मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणे निश्चित झाल्याने रामराजे बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मोहिते-पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित, रामराजे निंबाळकरांच्या छुप्या मदतीची चर्चा, अजितदादांच्या अडचणी वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget