बदलापूरच्या शाळेत लहान मुलींचे अश्लील चित्रफित, अवयव विक्रीचा प्रकार; नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप, म्हणाले....
Nana Patole: बदलापूर (Badlapur) मधील एका नामांकित शाळेमधील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा दाखला देत नाना पटोले यांनी खळबळजनक आरोप केलाय.
Nana Patole: बदलापूर (Badlapur) मधील एका नामांकित शाळेमधील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur School Sexual Assault Case) झाल्याची घटना घडली होती. या शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचारची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. दरम्यान, याच घटनेचा दाखला देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) काही गंभीर आरोप केले आहे. ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित असून या शाळेत लहान मुलींचे अश्लील चित्रफिती तयार करणे, अवयव विक्री करणे, अशा पद्धतीचे उद्योग सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका जाहीर सभेत केला आहे. हा आरोप त्यांनी नांदेड येथील वाजेगाव येथील जाहीर सभेत केला आहे. आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.
एक पोलीस महासंचालक वेटिंगवर तर एक खुर्चीवर- नाना पटोले
नांदेडमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला. या घटनेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा सुवस्था राहिली नाही. नाना पाटोले यांनी मात्र लक्ष्मण हाके यांचं नावं घेतल नाही. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची काँग्रेसच्या तक्रारी वरून बदली झाली. आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नियमित पोलीस महासंचालकाची नियुक्ती व्हायला पाहिजे होती. पण आता महाराष्ट्रात एक पोलीस महासंचालक वेटिंगवर आहे आणि एक खुर्चीवर बसलेला आहे. त्यामुळे पोलीस विभागात संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात कायदा सुवस्था महायुतीच्या काळात बिघडली आहे. या सरकारच्या काळात कोणाचाही जीव सुरक्षित नाही. महिला सुरक्षित नाही, तर इतर कोणीही सुरक्षित नाही, अशी प्रतिक्रीया नाना पटोले यांनी दिली.
बदलापूरमधील इतर आरोपींना शिक्षा कधी?
बदलापूरच्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे ही सर्वांचीच मागणी होती, पण या प्रकरणातील इतर आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय पीडित कुटुंबीयांना न्यायही मिळणार नाही. या संपूर्ण प्रकरणात लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बदलापूर शाळेचे विश्वस्त आपटे अजूनही फरार का? त्यांना संरक्षण कोण आणि का देत आहे? त्या व्यक्तीचा भाजपशी थेट संबंध असल्याने त्याच्यावर कारवाई न करण्याचा दबाव पोलिसांवर टाकला जात आहे का? बदलापूर शाळेचे CCTV फुटेज गायब का झाले? याला कोण जबाबदार? कोणाला पाठीशी घातले जात आहे? पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास उशीर का केला? त्यावेळेस त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे सरकार देत नाही आणि या क्रूर गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. या गुन्ह्याचा निषेध करणाऱ्या नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनीही केली होती.
हे ही वाचा