एक्स्प्लोर

विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-राष्ट्रवादी 125-125 जागा लढवणार

विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजणार आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून आता युतीच्या जागावाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. यामध्ये काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. तसेच यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप, जोगेंद्र कवाडे, राजू शेट्टी, आणि इतर डावे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फॉर्म्युला ठरला असताना युतीच्या जागावाटपाबाबत मात्र अजुनही चर्चाच सुरु आहे. दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या आणि मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या यावरुन युतीमध्ये आणखी मतभेद आहेत. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला 120 जागा देण्यास तयार आहे मात्र शिवसेनेनं 135 जागांची मागणी लावून धरली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच युतीतील मित्रपक्षांना नेमक्या किती जागा देण्यात येणार, याबद्दलही चर्चा आहे. युतीतील मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो.
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Embed widget