(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashok Chavhan: काँग्रेसने आत्मविश्वास गमावलाय, हे पराभूत मानसिकतेचे लक्षण; अशोक चव्हाण यांची बोचरी टीका
Ashok Chavhan: काँग्रेसच्या जाहिरातीत इतर राज्याचा मुख्यमंत्री दिसतो हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 नांदेड : काँग्रेसने (Congress) आत्मविश्वास गमावला आहे. महविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जाहिरातीत प्रकाशकाचे नाव दिसत नाही, यावर निवडणूक आयोगाने कारवाई करणे गरजेचे आहे, भाजप याबाबत तक्रार करतेय. जाहिरातीत इतर राज्याचा मुख्यमंत्री दिसतो हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. पुढे बोलतांना त्यांनी मी सेक्युलर आहे आणि हिंदू आहे, हिंदू माणूस सेक्युलर नसतो का असे म्हणत अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसमध्ये होतो तेव्हा प्रामाणिक काम केलं, मात्र..
राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे पण मग लाल संविधान का? लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर आणि एनआरके चा अर्थ असतो डिसऑर्डर. त्यामुळे तुम्ही अराजक पसरवत आहात. संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम याठिकाणी होत आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल.
देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल, हेच काम अराजकतेला पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे. अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचावर केली. याराव भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले की, मी जुन्या पक्षाबाबत तिथं काय चालत होते याबाबत आता बोलत नाही, तिथं होतो तेव्हा प्रामाणिक काम केले. आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांना जास्त माहिती असेल, आमचा भाग तसाही नक्षली आहे, असे म्हणत त्यांनी उपरोधिक टोला देखील लगावला.
जो शिमगा सुरू आहे त्याला मतदार पसंती देणार नाही- अशोक चव्हाण
महाराष्ट्रात गुंतवणूक वाढेल तर त्याला विरोध कशाला कुणाचा हवा. लोकांसोबत चर्चा केली की विरोध मावळतो. उद्धव साहेबांनी पॉलिटिकल स्टेटमेंट यावरून करू नये. तसेच मी राज्यसभेवर आहे, मग लोकसभेत कशाला जाऊ, माझी मुलगी लढते आहे, मी ही लढावे, मला संयुक्तिक वाटत नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले. तर संजय राऊत साहेब आपण एक पक्षाचे प्रवक्ते आहोत, वयक्तिक पातळीवर न जाता आरोप प्रत्यारोप करावे. जो शिमगा सुरू आहे मतदार याला पसंती देणार नाही. असेही अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा