एक्स्प्लोर

Anis Ahmad: काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री अनिस अहमद पुन्हा स्वगृही; रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

Anis Ahmad: ऐन विधानसभा निवडनुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केलेले अनिस अहमद हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : ऐन विधानसभा निवडनुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केलेले अनिस अहमद (Anis Ahmad) हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असलेले अनिस अहमद आज पुन्हा कांग्रेसमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांच्या उपस्थितीत ते आज पक्ष प्रवेश करत माघारी परतणार आहे. अनिस अहमद हे कांग्रेसचे माजीमंत्री  राहीलेले आहेत. शिवाय  ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (All India Congress Committee) चे राष्ट्रीय सचिव देखील राहिले आहे. मात्र त्यांनी अलिकडे वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला आणि नागपूरमधून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. परिणामी अनिस अहमद यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागलीय. 

मला कळलं की माझा निर्णय चुकीचा- अनिस अहमद

काँग्रेसमध्ये माझी काही नाराजी होती म्हणून मी काँग्रेसमध्ये राहून वंचितचा एबी फॉर्म घेण्यास गेलो होतो. मात्र वेळेवरती न पोहोचू शकल्यामुळे तो अर्ज भरु शकलो नाही. दरम्यान, रागात मी हा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर मला कळलं की हा चुकीचा निर्णय आहे. आपण काँग्रेस विचाराचे आहोत म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये आलो आहे. लहानपणी वडिलांनी मला असंच रागवल्यानंतर मी चोवीस तास घरातून निघून गेलो होतो,  मात्र कळल्यानंतर पुन्हा आलो तसंच आता येतोय. माझी आता कोणतीही नाराजी नाही,  कारण काँग्रेसमुळेच एवढं काही मी करू शकलो.

काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही-अनिस अहमद

दरम्यान, अनिस अहमद यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याने मध्य नागपूरमधून अर्ज भरण्याची संधी हुकली आहे. यावर काही दिवसांपूर्वी बोलताना अनिस अहमद म्हणाले होते की, उमेदवारी अर्ज दाखल न होऊ शकल्या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. आम्हाला मध्य नागपूर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील 29 तारखेचे व्हिडिओ फुटेज हवे आहे. दरम्यान माझा उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही, याच्याशी काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही. मला कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांचा फोन आलेला नव्हता. तसेच माझा कुठलाही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं झालेलं नाही. असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP MajhaJayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
×
Embed widget