एक्स्प्लोर
नरेंद्र मोदींना फासावर लटकवलं पाहिजे, काँग्रेस आमदाराचं वक्तव्य
स्वतः पंतप्रधानांनी म्हटलं होत की, शंभर दिवसात काळा पैसा आला नाही तर मला फासावर लटकवा. राठिया यांनी याच वक्तव्याला धरत त्यांच्यावर टीका केली.

रायपूर : लोकसभेच्या निवडणुकांचा रोमांच शिगेला जात पोहोचत असताना वादग्रस्त विधानं करण्याची प्रकरणं देखील वाढत आहेत. यामध्ये आता छत्तीसगडच्या एका आमदाराची भर पडली आहे. या आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी केली आहे.
नुकतेच महाड येथील सभेतही राज ठाकरे यांनी देखील नरेंद्र मोदींना नोटबंदी फसल्याने आता शिक्षा घेण्यासाठी कुठला चौक निवडता? असा सवाल केला होता.
यानंतर छत्तीसगडचे आमदार आणि रायगड लोकसभेचे उमेदवार लालजीत राठिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फासावर लटकवले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.
राठिया यांनी म्हटलं आहे की, नोटबंदी आणि काळा पैसा आणण्यात मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत. स्वतः पंतप्रधानांनी म्हटलं होत की, शंभर दिवसात काळा पैसा आला नाही तर मला फासावर लटकवा. राठिया यांनी याच वक्तव्याला धरत त्यांच्यावर टीका केली.
यावर उत्तर देताना भाजपने त्यांच्या ट्विटरवरून म्हटलं आहे की, त्यांना नरेंद्र मोदींना फासावर लटकावण्यासाठी त्यांना मतं हवी आहेत. साध्वीला 24 दिवस उपाशी ठेवणे, उमा भारतींना जलसमाधी देण्यासाठी काँग्रेसला मतं हवी आहेत, यांचा अहंकार पाहा, अशी टीका भाजपने केली आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















