एक्स्प्लोर

मोठी बातमी! काँग्रेसचे 54 उमेदवार निश्चित, महत्त्वाची नावं 'एबीपी माझा'च्या हाती; अनेक बड्या नेत्यांना तिकीट

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे जवळपास 45 उमेदवार निश्चित झालेले आहेत. 22 ऑक्टोबरला या उमेदवारांची घोषणा होणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 नावे आहेत. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी उद्या म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातील काही प्रमुख उमेदवारांच्या नावांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 

निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे

नाना पटोले - साकोली

विरेंद्र जगताप- धामणगाव

यशोमती ठाकूर- तिवसा

विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी

अमित झनक- रिसोड

नितीन राऊत- उत्तर नागपूर

विकास ठाकरे- पश्चिम नागपूर

रणजित कांबळे- देवळी (वर्धा)

सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर)

डॉ सुनील देशमुख - अमरावती शहर

बबलू देशमुख- अचलपूर 

विदर्भातील जागांवरून वाद

महाविकास आघाडीत सध्या विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत. तर काँग्रेस शिवसेनेला 8 जागा देण्यास तयार आहे. या भागात आमची ताकद जास्त असून आम्हीच या भागातून अधिक जागांवरून निवडणूक लढवणार, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र ठाकरेंची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी अनेक बैठका पार पडल्या. मिळालेल्या माहितीनुसार आता या जागांवर जवळपास तोडगा निघालेला आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भाजपाच्या पहिल्या यादीत 99 जणांची नावे

कालच भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या उमेदवारी यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राम कदम अशा प्रमुख नेत्यांच्या समावेश होता. भाजपची दुसरी उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या उमेदवारी यादीवर नजर टाकल्यास महायुतीचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार भाजप 158, शिंदे गट 85 आणि अजितदादा गट 45 जागांवर लढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! महाविकास आघाडीचं ठरलं? आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार, जागावाटपाची घोषणा करण्याची शक्यता

BJP candidate list Mumbai: भाजपची विधानसभेची उमेदवारी यादी जाहीर, राम कदमांना 'अयोध्या नरेश' पावला, तमिल सेल्वन यांना पुन्हा संधी

नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Embed widget