नारायण राणेंचे निकटवर्तीय कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी; नवव्यांदा वडाळ्याचे किंगमेकर ठरणार?
Wadala Vidhan Sabha Election 2024: कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. ज्या-ज्या वेळी नारायण राणे यांनी पक्ष सोडला, त्या-त्या वेळी कालिदास कोळंबकर यांनी त्यांना साथ दिली.
Kalidas Kolambkar BJP Candidate for Vidhan Sabha Election 2024: मुंबई : वडाळ्यातून (Wadala Vidhan Sabha Election 2024) आठ वेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांना भाजपकडून (BJP) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील (Mumbai Vidhan Sabha Nivadnuk 2024) वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर यांना भाजपनं रिंगणात उतरवलं आहे. कालिदास कोळंबकर तीन वेळा वडाळ्यातून तर पाच वेळा नायगावमधून आमदार राहिले आहेत. कालिदास कोळंबकर काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये आले. भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या 99 उमेदवारांच्या यादीत कालीदास कोळंबकर यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.
कालिदास कोळंबकर हे नारायण राणे (Narayan Rane) यांचे कट्टर समर्थक मानले जातात. ज्या-ज्या वेळी नारायण राणे यांनी पक्ष सोडला, त्या-त्या वेळी कालिदास कोळंबकर यांनी त्यांना साथ दिली. आजवरच्या राजकीय प्रवासात नारायण राणेंसोबत अगदी सावलीसारखे राहिले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. तेव्हापासून 2019 पर्यंत कालिदास कोळंबकर यांनी वडाळा विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं.
नारायण राणेंसाठी आधी शिवसेना, नंतर काँग्रेस सोडली
नारायण राणे म्हणजे, शिवसेनेचे प्रबळ नेते. पण, 2005 मध्ये नारायण राणेंनी आपल्या राजकीय कारकीर्दीतील मोठा निर्णय घेतला आणि शिनसेनेला रामराम केला. नारायण राणेंनी घेतलेल्या निर्णयात त्यांच्यासोबत कालिदास कोळंबकर सावलीसारखे उभे होते. कालिदास कोळंबकर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर कोळंबकर यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले.
सलग आठ विजयांसह कालिदास कोळंबकर यांचं वर्चस्व कायम
कालिदास कोळंबकर यांनी सलग आठ वेळा आमदारकी मिळवली आहे. 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली होती. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2006 ते 2014 दरम्यान झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि मतदारसंघात आपला दबदबा कायम राखला. 2014 मध्ये कोळंबकर यांनी तत्कालीन भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यावर 800 मतांनी विजय मिळवला होता. यानंतर कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019 मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वडाळा विधानसभा मतदारसंघात कोळंबकर यांना 56 हजार 485 मतं मिळाली होती. तर , त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांना केवळ 25 हजार 640 मतं मिळाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महायुतीचं ठरलं? वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात 'हा' हुकुमी एक्का निवडणुकीच्या रिंगणात; चर्चांना उधाण