UP Election 2022: काँग्रेसकडून 64 उमेदवारांची चौथी यादी जाहीर
UP Election 2022: यूपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं (Congress) उमेदवारांची आणखी एक यादी जारी केलीय. ज्यात एकूण 61 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय.
UP Election 2022: यूपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं (Congress) उमेदवारांची आणखी एक यादी जारी केलीय. ज्यात एकूण 61 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय. या यादीत 24 महिलांचा समावेश आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं 40 टक्के महिलांना तिकीट देण्याचा निर्णय घेतलाय.
काँग्रेसनं शिखा पाडें (बिलासपूर), चांदनी (श्री नगर), जितेंद्र देवी (धौराहारा), वंदना भार्गव (बिस्वान), सुधा द्विवेदी (सरेनी), शकुनलता देवी (कैमगंज), अर्चना राठोड (भोजपूर), विनिता देवी (कन्नौज), करिश्मा ठाकूर (गोविंदनगर) राजकुमारी (हमीरपूर), पवन देवी कोरी (नारायणी), हेमलता पटेल (अया शाह), रीता मौर्य (अयोध्या), गीता सिंह (कैसरगंज), सविता पांडे (तारबगंज), कमला सिसोदिया (मानकापूर), सबिहा खातून (खलीलाबाद), दुलारी देवी (सालेमपूर), डॉ.ओमलता (रसारा), सोनम बिंद (बैरिया), आरती सिंग (बदलापूर), गीता देवी (मरिहान), विदेश्वरी सिंह राठोड (घोरावळ) यांना तिकीट तिकीट दिलंय.
काँग्रेसनं बुधवारी 89 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. ज्यात 37 महिलांना तिकीट देण्यात आलं होतं. या यादीत बेहतमधून पूनम कंबोज, बिजनौरमधून अकबरी बेगम, नूरपूरमधून बालादेवी सैनी आणि हाथरसमधून सरोज देवी यांना तिकीट देण्यात आलंय. याशिवाय अनेक महिलांना उमेदवारी देण्यात आली. यापूर्वी, 20 जानेवारी रोजी पक्षाने 41 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती, ज्यात 16 महिला उमेदवारांचा समावेश होता.
पक्षाने 13 जानेवारी रोजी 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, आणि त्यात 50 महिलांना तिकीट देण्यात आलंय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका सात टप्प्यात पार पडणार आहे आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार असून सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 मार्चला होणार आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
- हे देखील वाचा-
- 'निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी', औरंगाबादेमधील अवलियाचं बॅनर तुफान व्हायरल
- Election 2022 : यूपीत शिवसेनेच्या सात उमेदवारांचे अर्ज बाद! संजय राऊत म्हणाले, कुणाला तरी आमची भीती वाटतेय
- Uttar Pradesh Election : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबद्दल अखिलेश यादव यांचे मोठे वक्तव्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha