एक्स्प्लोर

Uttar Pradesh Election : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबद्दल अखिलेश यादव यांचे मोठे वक्तव्य

आज समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांनी मुजफ्फरनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी अखिलेश यादव यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले.

Uttar Pradesh Assembly Election 2022: विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पाच राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टी यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. आज समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांनी मुजफ्फरनगर येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अखिलेश यादव यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राकेश टिकैत यांना मी समजावणार आहे, ते आमच्या रथात बसतील असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे. 

भाजपने आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांना सोबत येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र,  आरएलडीच्या अध्यक्षांनी ही ऑफर फेटाळली. त्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली. अखिलेश यादव म्हणाले की, भाजप आणि अमित शहांचे निमंत्रण कोण स्वीकारत आहे? आज जयंत चौधरी आणि मी वारसा पुढे नेत आहोत. ही निवडणूक चौधरी चरणसिंग यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आहे. त्यांना शेतकरी समृद्ध बनवायचा होता. भाजपने आपला ठराव वाचावा, त्यामध्ये दिलेली आश्वासन पूर्ण केली आहेत का? यावेळी ऐतिहासिक विजय होणार आहे. आरएलडी आणि सपा मिळून भाजपचा पराभव करणार आहेत. आम्ही दोघेही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे अखिलेश यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मतांचा आदर न करता केंद्र सरकारने तीन कायदे आणले होते. शेतकऱ्यांनी एकजुटीने सरकारला कायदा मागे घेण्यास भाग पाडले. निवडणुकीसाठी केंद्र सरकारने हे तीन कायदे मागे घेतले आहेत. मी शेतकऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की यूपीमध्ये असा कोणताही कायदा लागू केला जाणार नाही. वीज 300 युनिट मोफत असेल आणि एमएसपीच्या खरेदीसाठी सरकारी व्यवस्था करावी लागेल, आम्ही ते करू असे आश्वासन यावेळी अखिलेश यादव यांनी दिले.

पाच राज्यांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय किसान युनिय कोणाला पाठिंबा देणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय किसान युनियन समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देणार असल्याचे बोलले जात होते. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघटनेचे (BKU) प्रमुख नरेश टिकैत यांनी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देण्याचा निर्णयही देखील घेतला होता. मात्र, त्यांच्या या निर्णयाचा त्यांचे बंधू राकेश टिकैत यांनी इन्कार करत विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका टिकैत यांनी मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget