Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झालं आहे.
मुंबई : महाविकास आघाडीमधील काँग्रेसने आपल्या विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. तर, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली असून शिवसेनेकडून (Shivsena) जाहीर झालेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगिरथ भालकेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भगिरथ भालके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, आता काँग्रेसकडून (Congress) अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने 4 थ्या यादीत अंधेरी पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या जागांवरील उमेदवारांची नावे बदलली आहेत.
सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमर पाटील हे उद्या आपला अर्ज देखील जाहीर करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे. सोलापुर दक्षिणमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढत होणार की ठाकरे गट उमेदवारी माघार घेणार हे पाहणे महत्वाचे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसने तिसऱ्या यादीत अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांनी उमेदवारी दिली होती, मात्र ती रद्द करुन अशोक जाधव यांना देण्यात आली आहे. तर, औरंगाबाद पश्चिममधून मधूकर देशमुख यांच्याऐवजी लहू शेवाळे यांना देण्यात आलीय. दरम्यान, पुण्यातील शिवाजी नगर मतदार संघातून काँग्रेसच्या दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, पुणे कॅनटॉनमेंट विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
ब्रेकिंग
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) October 27, 2024
काँग्रेसची चौथी यादी pic.twitter.com/wQMYQBBv3W
काँग्रेसची 4 थी यादी
1.अमळनेर - अनिल शिंदे
2.अमरेड - संजय मेश्राम
3.आरमोरी - रामदास मश्राम
4.चंद्रपूर - प्रवीण पडवेकर
5.बल्लारपूर - संतोषसिंह रावत
6.वरोरा- प्रवीण काकडे
7.नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार
8.ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे
9.नालासोपारा- संदीप पांडेय
10.अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
11.शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट
12.पुणे छावणी- रमेश बागवे
13.सोलापूर दक्षिण- दिलीप माने
14.पंढरपूर- भगिरथ भालके
हेही वाचा
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी