एक्स्प्लोर
Advertisement
दिलीप गांधींचं काम चांगलं मात्र काँग्रेसवर 'सर्जिकल स्ट्राईक'साठी सुजय विखेंना पसंती : मुख्यमंत्री फडणवीस
गांधी यांनी चांगलं काम केलं मात्र कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर तो सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असे फडणवीस म्हणाले.
अहमदनगर : अहमदनगरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खासदार दिलीप गांधी यांच्या कामाचं कौतुक केलं. खासदार दिलीप गांधींनी चांगलं काम केलं. तुम्हाला विसरणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, गांधी यांनी चांगलं काम केलं मात्र कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर तो सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असे फडणवीस म्हणाले.
VIDEO | राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंगला आले, अन् बारावा खेळाडू म्हणून परतले, फडणवीसांचं भाषण | अहमदनगर | एबीपी माझा
अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि सात दिवसात 12 वा खेळाडू म्हणून बसले.
भाषण करताना रोखल्याने खासदार दिलीप गांधींचा संताप
दरम्यान, भाजपच्या प्रचारसभेत भाषण करताना रोखल्यानं भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी संतापले. यावेळी त्यांनी आयोजकांवर नाराजी व्यक्त करत भाषण सुरुच ठेवलं. यावेळी मागील 5 वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडताना दिलीप गांधी भावूक झाले. शेवटी भाषणात दिलीप गांधींनी सुजय विखेंचं नाव न घेता मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं.
VIDEO | भाषण थांबवण्यास सांगितल्यावर खासदार दिलीप गांधींचा संताप | अहमदनगर | एबीपी माझा
प्रचारसभेच्या सुरुवातीला गांधी बोलायला उभे राहिले असताना त्यांना भाषण आवरतं घेण्यासाठी सांगितलं गेलं. यावेळी ते चांगलेच भडकले.
शरद पवारांना आता काय झालंय काही समजत नाही : मोदी
देशाच्या नावावर काँग्रेस पक्षाची साथ सोडणाऱ्या शरद पवारांना आता काय झालंय काही समजत नाही. देशात दोन पंतप्रधान आणायची भाषा करत काँग्रेसवाले काश्मीरला तोडण्याची भाषा करत आहेत. असं असताना शरदराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहून तुम्हाला झोप कशी लागते, या अशा शब्दात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेसचे नेते काश्मीरला वेगळं करायचं म्हणणात. मात्र शरद पवारांना काय झालंय? तुम्ही देशाच्या नावावर काँग्रेस सोडली. आता दोन पंतप्रधान होणार यावर तुम्ही गप्प का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
ज्या काश्मीरसाठी देशातील हजारो सैनिकांनी बलिदान दिलं ते काश्मीर सोडायचे का? असे म्हणत तुम्हीदेखील विदेशी चष्म्यातून बघायला लागलात काय अशी टीका मोदींनी पवारांवर केली. तुम्ही राष्ट्रवादी असं तुमच्या पक्षाचे नाव ठेवलंय, मात्र भूमिका शोभणारी नाही. शरदराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर राहात असून तुम्हाला झोप कशी येतेय? असा सवालही मोदींनी यावेळी केला.
अहमदनगरच्या सभेत देखील मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. 'शिर्डी साईबाबाच्या सानिध्यात असलेल्या या नगरीला माझे नमन. महाराष्ट्र आणि अहमदनगरच्या सर्व बांधवाना उद्याच्या रामनवमीच्या खूप शुभेच्छा' अशा शब्दात मोदींनी सुरुवातीला शुभेच्छा दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement