2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून या मिरवणुकीत सहभागी होत बहुमताने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या
ठाणे : विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या 29 ऑक्टोबर रोजी अंतिम मुदत आहे. त्यामुळे, आज मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांच्या व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरुन निवडणुकीच्या मैदानात अधिकृतपणे शडडू ठोकला आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (Shivsena) पक्षाच्यावतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसैनिक तसेच महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह यावेळी, मुख्यमंत्र्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. दरम्यान, निवडणूक अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून एकनाथ शिंदे यांनी एकूण संपत्ती जाहीर झाली आहे. गेल्या 5 वर्षांत मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली, याचीही आकडेवारी यातून समोर आलीय.
एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून मुख्यमंत्री शिंदेंच्या अर्ज भरतानाच्या मिरवणुकीत सहभागी होत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरातील महायुतीचे तीनही उमेदवार विजयी करत या शहरावर विजयाचा भगवा पुन्हा फडकवण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. येथील मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होत असून शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर, मनसेकडूनही येथील मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात येणार आहे.
दरम्यान, 2019 साली राज्याच्या नगरविकास विभागाचे मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांची संपत्ती 11 कोटी रुपये एवढी होती. मात्र, 2022 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे, यंदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, 2024 ला मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत किती पटीने वाढ झालीय. सध्या त्यांची एकूण संपत्ती 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये एवढी आहे. गत 2019 च्या तुलनेत ही संपत्ती 26 कोटी 11 लाख 85 हजार रुपयांची वाढ आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29 लाख 23 हजार 410 रुपये कर्ज असून त्यांच्या पत्नीवर 9 कोटी 99 लाख 65 हजार 988 रुपयांचं कर्ज आहे.
पाच वर्षात 26 कोटी 11 लाख 85 हजारांची वाढ
जिल्हा - ठाणे
मतदारसंघ - कोपरी पाचपाखाडी
नाव - एकनाथ शिंदे
वय - 60
पक्ष - शिंदे सेना
शिक्षण - बी.एस.सी.
संपत्ती 2024 - 37,68,58,150
संपत्ती 2019 - 11,56,72,466
दाखल गुन्हे - 18
गंभीर गुन्हे - ००
कास्ट - मराठा
जंगम - 1,44,57,155 - पत्नी - 7,77,20,995 - एकूण - 9,21,78,150
स्थावर - 13,38,50,000 - पत्नी -15,08,30,000 - एकूण - 28,46,80,000
कर्ज - 5,29, 23,410 - पत्नी - 9,99,65,988 रुपये एवढं आहे.
हेही वाचा
Ajit Pawar: तुटायला वेळ लागत नाही, अजित पवार भावूक; अर्ज भरल्यानंतर बारामतीकरांना भावनिक साद