एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhattisgarh Election 2018: पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान
बिजापुरात नक्षलींसोबत झालेल्या चकमकीत कोबरा बटालियनचे पाच जवान जखमी झाले.
रायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यात 90 पैकी 18 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. नक्षलग्रस्त भागातील आठ जिल्ह्यात मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह 190 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नक्षलवाद्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी तीन वेळा हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक जवान जखमी झाले, अनेक नागरिकांचाही यामध्ये मृत्यू झाला. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी जवळपास सव्वा लाख जवान विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र बिजापुरात नक्षलींसोबत झालेल्या चकमकीत कोबरा बटालियनचे पाच जवान जखमी झाले.
18 पैकी 13 जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव आहेत. उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 11 डिसेंबरला निकाल जाहीर होतील.
रमणसिंह सरकार
छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आहे. रमणसिंह सलग तिसऱ्यांदा सीएमच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालण्यास ते उत्सुक आहेत.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांनी राजनंदगावमधून रमणसिंह यांना आवाहन दिलं आहे. शुक्ला या 2004 मध्ये जंजगिरमधून भाजप खासदार होत्या. 2009 मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. 2013 मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
छत्तीसगडमधील चित्र काय?
छत्तीसगड विधानसभेत 90 आणि लोकसभेच्या 11 जागा आहेत. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता. तर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत 10 जागा भाजपला आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती.
पहिला टप्पा : 12 नोव्हेंबर 2018
किती जागांसाठी मतदान? : 18/90
मतदान केंद्र : 4 हजार 336
पुरुष मतदार : 15 लाख 57 हजार 435
महिला मतदार : 16 लाख 22 हजार 492
तृतीयपंथी मतदार : 87
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार? : (18 जागा)
काँग्रेस : 18
भाजप : 18
आप : 17
जनता काँग्रेस (अजित जोगी) : 10
आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) : 10
बसप : 8
शिवसेना : 8
अपक्ष : 68
इतर : 33
विधानसभा निवडणूक 2013 मधील चित्र : (18 जागा)
काँग्रेस : 12
भाजप : 6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement