Chandrapur Nagarpanchayat Election Result: चंद्रपुरात काँग्रेसची सरशी, सर्वाधिक जागा जिंकत तीन नगरपंचायतींवर झेंडा
Chandrapur Nagarpanchayat Election Result 2022: या निवडणुकीत काँग्रेसनं 6 पैकी 3 जागेवर बहुमत मिळवलंय. तर 2 जागी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय.
Chandrapur Nagarpanchayat Election Result 2022: चंद्रपूर जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या निवडणूक निकालात काँग्रेसची (Congress) सरशी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं 6 पैकी 3 जागेवर बहुमत मिळवलंय. तर 2 जागी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील पोंभूर्णा नगर पंचायतीत भाजपची सरशी झाली आहे. सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही नगरपंचायतींच्या 102 जागांपैकी सर्वाधिक 53 जागा जिंकून काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. ज्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत आहेत.
भारतीय जनता पक्षाला 24 जागा तर, राष्ट्रवादीला 8 आणि शिवसेनेनं 6 जागा जिंकल्या आहेत. याव्यतिरिक्त अपक्षांना 11 जागा मिळाल्या आहेत. सावली नगरपंचायतीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बालेकिल्ला राखत दणदणीत विजय खेचून आणला आहे. दरम्यान, सावली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष बघायला मिळत आहे. तर, पोंभूर्णा नगर पंचायतीत भाजप कार्यकर्ते गुलालाची उधळण करत आहेत. काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी येथे त्रिशंकू स्थिती आहे. तर कोरपना आणि जिवती येथे काँग्रेसने धडाकेबाज कामगिरी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपंचायतीतील ओबीसी प्रवर्गाकरीता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही नगरपंचायतीतील या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
- Sangli Nagar Panchayat Election Result 2022 : कवठे महांकाळमधून रोहित पाटलांची जोरदार एन्ट्री तर कडेगावात विश्वजित कदमांना धक्का
- Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; निकालात कुणाची सरशी, पाहा प्रत्येक अपडेट
- Jalna Nagar Panchayat Election Result 2022 : जालना नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; तर भाजप, शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha