एक्स्प्लोर

Chandrapur Deputy Mayor Election 2026: चंद्रपूर उपमहापौरपदाचा ईश्वर चिठ्ठीने फैसला, दोन्ही उमेदवारांना 32-32 मतं; ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव विजयी, नेमकं काय घडलं?

Chandrapur Deputy Mayor Election 2026: उपमहापौर पदासाठी झालेल्या मतदानात पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव यांना समसमान 32-32 मते मिळाली होती. अखेर ईश्वर चिठ्ठीने उपमहापौर पदाचा फैसला करण्यात आला.

Chandrapur Deputy Mayor Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा मंगळवारी नाट्यमय शेवट झाला असतानाच, उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही मोठा थरार पाहायला मिळाला. उपमहापौर पदासाठी झालेल्या मतदानात काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव (Prashant Danav) यांना समसमान 32-32 मते मिळाल्याने निवडणूक अडचणीत सापडली. अखेर ईश्वर चिठ्ठीने उपमहापौर पदाचा फैसला करण्यात आला.

उपमहापौर निवडणुकीपूर्वी एमआयएमचा एक नगरसेवक काँग्रेस समर्थित उमेदवार पप्पू देशमुख यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार मतदान झाल्यास दोन्ही उमेदवारांना समान मते मिळण्याची शक्यता होती आणि प्रत्यक्षात तसेच घडले. दोन्ही बाजूंना प्रत्येकी 32 मते मिळाल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Chandrapur Deputy Mayor Election 2026: ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव विजयी

नियमांनुसार मतांची बरोबरी झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांचे नाव निघाल्याने ते चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे उपमहापौर म्हणून विराजमान झाले.

Chandrapur Mayor Election 2026: महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर

दरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरे गटाला सोबत घेत सत्ता स्थापन करत राजकीय चमत्कार घडवला. भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने महापौरपदाची निवडणूक जिंकली. त्यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला 31 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने बहुमताचा आकडा 33 वर आला होता. एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यामुळे निकालावर निर्णायक परिणाम झाला.

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूरचे सत्तानाट्य राज्यभर चर्चेचा विषय 

या सत्तास्थापनेत उद्धव ठाकरे गटाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपकडे सुरुवातीला 24 नगरसेवकांचे संख्याबळ होते. यामध्ये भाजपचे 23 आणि शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक यांचा समावेश होता. त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली सहा नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवक भाजपसोबत आल्याने भाजपचे संख्याबळ 32 वर पोहोचले. एकूणच, चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांच्या निवडणुकांनी राजकीय थरार शिगेला पोहोचवला. एका बाजूला एका मताने महापौरपदाचा निर्णय, तर दुसऱ्या बाजूला चिठ्ठीद्वारे उपमहापौरपदाचा फैसला झाल्याने चंद्रपूरचे सत्तानाट्य राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.

Chandrapur Mahanagarpalika Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील संख्याबळ

एकूण जागा 66

काँग्रेस 27
काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली जनविकास सेना 3
भाजप 23
शिंदेंसेना 1
उबाठा शिवसेना 6
वंचित 2
बसपा 1
अपक्ष (काँग्रेस बंडखोर) 2
एमआयएम 1

आणखी वाचा 

चंद्रपूरमध्ये राजकीय उलथापालथ, उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा, संदीप गिऱ्हेंसह 6 नगरसेवकांवर कारवाई होणार?

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget