एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांचा अफझल खान म्हणून उल्लेख, भाजपकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया

2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती.

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीकाळी भाजप अध्यक्षांचा उल्लेख अफजलखान होता, त्यावर आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने पहिल्यांदाच कोणीतरी प्रतिक्रिया दिली आहे. युती झाली आहे, मात्र काही शब्द जपून वापरायचे असतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. सोलापूरमधील पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. 2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती. यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने वारंवार भाजप, अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक प्रहार केले होते. मात्र 30 मार्च रोजी भाजप अध्यक्ष अमित शाह उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरमध्ये हजेरी लावली होती. याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, "त्या-त्या वेळेला मतभेद होऊन काही शब्द उच्चारले जातात. ते फार जपून वापरायचे असतात. पण असे शब्द कुटुंबातही वापरले जातात. नवरा-बायको भांडतानाही एकमेकांना बोलतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी चहा एकत्र पितात. मला वाटतं त्या-त्या घटनांमध्ये बोललं गेलं असेल. माणूस तो चांगला, जो नंतर बोलतो की, हे चुकलं आणि आता आपण बरोबर काम करु." VIDEO | शब्द जपून वापरायला हवे होते : चंद्रकांत पाटील संबंधित बातम्या अमित शाहांचा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरेंची हजेरी विरोधकांचा नेता कोण, उद्धव ठाकरे यांचा सवाल LIVE : अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget