एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Karvir Vidhan Sabha : राज्यात सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघात शिंदेंच्या शिलेदाराची बाजी; अवघ्या 1976 मतांनी विजय मिळवत आमदारकी खेचली

सोशल मीडियावर नरके आणि राहुल पाटील यांच्या दोन्ही गटांकडून विजयाचे दावे प्रति दावे केले जात होते. मात्र अखेर ईव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नरके 1976 मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

Karvir Vidhan Sabha : ज्या करवीर विधानसभा मतदारसंघातील तब्बल 80 हजारांच्या मताधिक्याने शाहू महाराज यांना खासदारकी दिली त्याच करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला अवघ्या काही महिन्यांमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. स्वर्गीय आमदार पीएन पाटील यांच्या अकालवी निधनाने त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, राहुल पाटील यांना करवीर विधानसभा मतदारसंघातून निसटता पराभव स्वीकारावा लागला. अवघ्या एक हजार 976 मतांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी राहुल पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे ज्या करवीरच्या मताधिक्यावर शाहू महाराज खासदार झाले त्याच करवीरमध्ये राज्यातील सर्वाधिक मतदान झालं होतं. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला झटका देणार याची चर्चा होती.

चंद्रदीप नरके यांनी 1976 मतांनी विजय मिळवला

दरम्यान, करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासून चंद्रदीप नरके आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र शेवटच्या क्षणी तीन-चार फेऱ्यांमध्ये चित्र पालटून अटीतटीची लढत होत होती. मात्र अखेरचा क्षणी चंद्रदीप नरके यांनी 1976 मतांनी विजय मिळवला. तत्पूर्वी, सोशल मीडियावर नरके आणि राहुल पाटील यांच्या दोन्ही गटांकडून विजयाचे दावे प्रति दावे केले जात होते. मात्र अखेर ईव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर चंद्रदीप नरके 1976 मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला जबर झटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये चार आमदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत मात्र हद्दपार व्हावं लागलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपामध्ये काँग्रेसने पाच जागा पटकावल्या होत्या आणि त्यानुसार चांगली कामगिरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र या सर्व विद्यमान आमदारांना पराभवाचे तोंड पाहावं लागलं आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गणपतराव पाटील यांना सुद्धा शिरोळमधून पराभवाचा झटका बसला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची स्थिती हिरोवरून झिरो अशी झाली आहे. 

जिल्ह्यात काँग्रेस हिरो ते झिरो

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सुद्धा सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. भाजप माजी आमदार अमल महाडिक यांनी ऋतुराज यांचा पराभव करत पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला असून दहाच्या दहा जागा महायुतीच्या उमेदवारांनी पटकावल्या आहेत. यामध्ये चंदगडमधून विजयी झालेले शिवाजी पाटील हे सुद्धा भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत. शिरोळमधील राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटाचे आणि महायुतीचे पुरस्कृत उमेदवार आहेत. हातकणंगलेमध्ये जनसुराज्यकडून अशोकराव माने यांना संधी देण्यात आली होती ते सुद्धा विजयी झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने महायुतीच्या विजयामध्ये 100 टक्के वाटा दिला आहे.

त्यामुळे मंत्रीपदाच्या शर्यतीत कोणाकोणाला संधी मिळते याकडे लक्ष असेल. दरम्यान, शिंदे गटाचे आणि भाजपची सुद्धा कामगिरी जिल्ह्यामध्ये दमदार झाले असल्याने कोणाला मंत्री कोणाला मंत्री पदाची संधी मिळणार याकडे लक्ष असेल दरम्यान शिंदे गटाकडून प्रकाश आंबेडकर आणि राजश्री सागर हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतील त्यामुळे दोघांपैकी कोणाला संधी मिळते याकडे आता लक्ष असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget