Byculla Vidhan Sabha Constituency: भायखळा विधानसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे लढाई; यामिनी जाधव गड राखणार की, ठाकरेंचा शिलेदार विजय हिसकावणार?
Byculla Vidhan Sabha Constituency: भायखळ्यात ठाकरेंकडून मनोज जामसुतकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर, शिंदेंकडून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Byculla Vidhan Sabha Constituency 2024 : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर राज्यात चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच यंदाची निवडणूक काहीशी वेगळी आहे. कारण शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांतील अंतर्गत फुटीनंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबईतही मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत (Mumbai Election 2024) अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत होणार आहे. अशातच भायखळ्यातही शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. भायखळ्यात ठाकरेंकडून मनोज जामसुतकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर, शिंदेंकडून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
2024 च्या विधानसभेच्या रिंगणात कोण आमने-सामने?
उमेदवाराचं नाव | पक्ष |
यामिनी यशवंत जाधव (Yamini Jadhav) | शिवसेना (महायुती) |
मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar) | ठाकरे गट (महाविकास आघाडी) |
फैयाज अहमद रफीक अहमद खान | एआयएमआयएम |
2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल
शिवसेना पक्षाचा यामिनी यशवंत जाधव 51,180 मतं मिळवून विजयी
एआईएमआईएम पक्षाचे अॅड. वारिस पठाण यांना दुसऱ्या क्रमांकाची 31 हजार 157 मतं मिळाली.
2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल
अॅड. वॉरिस युसुफ पठाण 25,314 मतं मिळवून विजयी
भाजपचे मधु (दादा) चव्हाण यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.
मतदारसंघाबाबत थोडसं...
भायखळा विधानसभा मतदारसंघ 2014 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 2014 नंतर इथे परिस्थिती बदलली. 2014 ला एमआयएमचे वारिस पठाण याच मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी भाजपच्या मधु चव्हाणांचा पराभव केला. त्यानंतर मात्र, 2019 ला वारिस पठाण यांचा पराभव झाला. शिवसेनेनं डाव टाकला आणि यामिनी जाधव यांचा या मतदारसंघात विजय झाला. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. महायुतीकडून ही जागा शिंदेंना सुटली असून शिंदेंच्या यामिनी जाधव रिंगणात आहेत. तर, महाविकास आघाडीकडून ठाकरेंना ही जागा मिळाली असून ठाकरेंनी आपला हुकुमी एक्का मनोज जामसुतकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, यामिनी जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी पार पडलेली लोकसभा निवडणुकही लढवली होती. मात्र, ठाकरेंच्या अरविंद सावंतांनी त्यांचा दारुण पराभव केला. आता पुन्हा आमदारकीसाठी यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राज्याच्या सत्तासंघर्षानंतर राजकीय समीकरणं पुरती बदलून गेली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारराजा कुणाला मतांचं दान देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा विधानसभा मतदारसंघ यंदा कोण काबीज करणार? महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी महायुतीचा डाव पलटवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.