एक्स्प्लोर

BMC Election : आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला तर एवढं बोलायची गरज काय? महापुरुषांच्या प्रतिमेसमोर महिला नाचवून 'भोजपुरी स्टाईल' प्रचाराचे बावनकुळेंकडून समर्थन

Mumbai Ward 157 Viral Video : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर महिला नाचवल्यानंतर दिलगिरी व्यक्त करणे सोडाच... पण भाजपच्या मंत्र्यांनी त्याचं समर्थन केल्याचं दिसून आलं.

मुंबई : यूपी, बिहारचं राजकारण... जिथे निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यक्रमात महिला नाचवल्या जातात, भोजपुरी गाण्यावर त्या थिरकतात, अश्लील हातवारे करतात आणि समोरचे लोक त्याचा विकृत आनंद घेतात. मतदारांना खुश करण्याचा हा फंडा यूपी, बिहार, झारखंड यासारख्या मागास उत्तर भारतीय राज्यांमध्ये हमखास अवलंबला जातो. पण तोच फंडा आता महाराष्ट्रात, मुंबईतही वापरला जात असल्याचं दिसून आलं. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर महिला नाचवल्या गेल्या... आणि विशेष म्हणजे, भाजपच्या मंत्र्यांनी त्या कृत्याचं समर्थन केल्याचं दिसून आलं.

या आधी महाराष्ट्राचा यूपी, बिहार झालाय असा अनेकदा आरोप केला जायचा, पण आता लोकांनी तो 'याची देही याची डोळा' पाहिला. मुंबईतील भाजपच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टेजवर चक्क महिलेला नाचवलं गेलं. त्यावरुन टीका होत असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र आपल्या स्थानिक नेत्याचं समर्थन केल्ं.

Mumbai BJP Woman Dance Video : नेमकं काय घडलं?

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मध्ये भाजपच्या उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचारासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन भाजपचे नेते, सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि नावाआधी आचार्य असं लिहिणाऱ्या पवन त्रिपाठी (Acharya Pawan Tripathi) यांनी केलं होतं. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्याच स्टेजवर काळ्या साडीतील एक महिला 'लैला मैं लैला' या गाण्यावर थिरकत होती.

या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी या कार्यक्रमाचा व्हिडीओ ट्वट करत टीका केली. मुंबईमध्ये भाजपकडून महिलांना नाचवून प्रचारसभेला गर्दी जमवण्यात येत असल्याचा आरोप अखिल चित्रेंनी केला. महापुरूषांच्या पुतळ्यासमोर महिलांना नाचवून भाजप महापुरूषांचा अपमान करत आहे अशी टीका करत 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा' असा प्रश्नही त्यांनी विचारला.

Chandrashekhar Bawankule : आमच्या महिलांचा आनंद... बावनकुळेंकडून समर्थन

पवन त्रिपाठीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमावरुन सर्व स्तरातून टीका होत असताना भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र त्याचं समर्थन केल्याचं दिसून आलं. 'लोकांनी आनंद व्यक्त केला. आमच्या प्रचार आणि प्रसारामध्ये, आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला तर एवढं बोलायची गरज काय आहे? शेवटी हा महिलांचा आनंद आहे' अशा शब्दात बावनकुळेंनी याचं समर्थन केल्याचं दिसून आलं.

यूपी, बिहारसारख्या उत्तरेतील मागास राज्यांमध्ये महिलांना नाचवणे ही गोष्ट नवीन नाही. निवडणुकीच्या कार्यक्रमात प्रत्येक पक्षाकडून अशा नाचगाण्याची सोय करण्यात येते, त्याशिवाय मतदारही खुश होत नाहीत. पण महाराष्ट्रासाठी मात्र हे नवीन आहे. मुंबईत हिंदी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी कदाचित, हिंदी भाषिक असलेल्या पवन त्रिपाठीने हा फंडा अवलंबला असेल. पण त्यातून महाराष्ट्राची संस्कृती मात्र लयास जात असल्याचं चित्र आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget