BMC Election : गोरेगावात ठाकरेंना धक्का! शिंदे दाम्पत्यांचा सकाळी 11 वाजता भाजपमध्ये प्रवेश ठरला, आदल्या रात्री 11 वाजता शिंदेंनी हेरला
Eknath Shinde Shivsena : दिलीप शिंदे आणि त्यांची पत्नी प्रमिला शिंदे हे दोघेही शिवसेना ठाकरे गटामधून माजी नगरसेवक होते. ऐनवेळी त्यांनी साथ सोडल्याने मतदानावर त्याचा परिणाम होणार अशी चर्चा आहे.

मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक असताना एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे गोरेगाव विधानसभा संघटक आणि तीन वेळचे नगरसेवक राहिलेले दिलीप शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रमिला शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केला आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हा प्रवेश झाला. शिंदे दाम्पत्य हे आधी भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र आदल्या रात्रीच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. असं असलं तरी त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का समजला जातोय.
दिलीप शिंदे आणि त्यांची पत्नी प्रमिला शिंदे हे दोघेही शिवसेना ठाकरे गटामधून माजी नगरसेवक होते. आता या दोघांनीही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश ठरला, मात्र शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला
शिंदे गटात पक्षप्रवेश करण्यापूर्वी शिंदे दाम्पत्य भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित करण्यात आला होता. मात्र त्याच्या आधीच सोमवारी रात्री 11 वाजता दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदे या दोघांनीही एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश केला.
ऐन मतदानाच्या तोंडावर शिंदे दाम्पत्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने गोरेगावमध्ये त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्याचवेळी शिंदे गटाची ताकद मात्र काही प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे.
बोगस मतदान रोखण्यासाठी ठाकरेंचे भगवा गार्ड्स
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या युतीच्या वतीनं मुंबई आणि आसपासच्या महापालिकांच्या निवडणुकीत बोगस मतदान रोखण्यासाठी भगवा गार्डसची तीक्ष्ण नजर ठेवण्यात येणार आहे. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली.
ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसेचे महाराष्ट्र सैनिक यांच्यावर भगवा गार्डसची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या महापालिका निवडणुकीत बोगस मतदार आणि बोगस मतदान रोखण्याची जबाबदारी भगवा गार्डसवर राहिल. ज्या ठिकाणी बोगस मतदार आढळतील त्या ठिकाणी त्यांचा शंभर टक्के करेक्ट कार्यक्रम केला जाईल, या शब्दांत संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंच्या आक्रमक पवित्र्याचे संकेत दिले.
ही बातमी वाचा:




















