एक्स्प्लोर
भाजपकडून तिकीट मिळणार नाही, पक्ष देईल तो आदेश मान्य : एकनाथ खडसे
पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्वतः एकनाथ खडसे यांनी आज (03 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक खडसे लढणार नाहीत, हे जवळपास निश्चित झालं आहे.
जळगाव : पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्वतः एकनाथ खडसे यांनी आज (03 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक खडसे लढणार नाहीत, हे जवळपास निश्चित झालं आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. परंतु या दोन्ही याद्यांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे खडसेंच्या उमेदवारीकडे लक्ष लागले होते. परंतु आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, हे खडसे यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, खडसे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी खडसे यांना अपक्ष निवडणूक लढावी, अशी मागणी केली आहे.
खडसे म्हणाले की, मला उमेदवारी दिली जाणार नाही. दरम्यान पक्ष मला जो आदेश देईल, मी त्याचं पालन करेन. मी पक्षाच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या 42 वर्षांपासून मी ते करतोय. अनेकदा मी पक्षाचे अनेक कटू निर्णय मान्य केले आहेत.
दरम्यान, एकनाथ खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र दुसऱ्या यादीतही खडसे कुटुंबियांपैकी कोणाचंही नाव आलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या यादीत तरी खडसे किंवा त्यांच्या मुलीचं नाव येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
जेव्हा नाथाभाऊ 'महाजनां'ना आत्महत्येपासून रोखतात | ABP Majha
भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत एकूण 14 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दोन्ही याद्या मिळून भाजपकडून आतापर्यंत 139 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार भारतीय जनता पक्ष राज्यात 146 जागा लढवणार आहे.
आता केवळ 7 जागा जाहीर करणं बाकी आहे. खडसेंप्रमाणे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची नावंदेखील जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे तिसऱ्या यादीत तरी तावडे, बावनकुळे यांची नावं असणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
एकनाथ खडसेंना उमेदवारी जाहीर न झाल्याने कार्यकर्ते नाराज | जळगाव | ABP Majha
संबंधित बातम्या:
जेव्हा नाथाभाऊ 'महाजनां'ना आत्महत्येपासून परावृत्त करतात!
सदस्यत्वाचा फॉर्म भरुन नितेश राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, नारायण राणेंबाबत सस्पेन्स कायम
भाजपची दुसरी यादी जाहीर, खडसे, तावडे, बावनकुळे यांचं नाव नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement