एक्स्प्लोर

BJP Task Force : अचूक नियोजन, मतांची आकडेमोड अन् चतुराई... भाजपच्या टास्क फोर्सने कसं काम केलं?

Rajya Sabha Election Result 2022 : राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू सहकार्‍यांची एक टास्क फोर्स नेमली आणि मोठ्या चतुराईने विजयश्री खेचून आणला.

Rajya Sabha Election Result 2022 : राज्यसभा निवडणुकीत भाजपनं अनपेक्षितपणे महाविकास आघाडीला धक्का देत विजयाचा गुलाल उधळला. सुरुवातीपासून भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात खास टास्क फोर्स नेमली आणि त्याचाच फायदा भाजपला झाला. बारकाईने केलेलं नियोजन आणि मतांची आकडेमोड यातून भाजपला हे यश मिळवता आलं.  राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागा जिंकून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपकडे 113 मतं असताना तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आणि 123 मतं घेऊन शिवसेनेला धूळ चारली.

राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू सहकार्‍यांची एक टास्क फोर्स नेमली आणि मोठ्या चतुराईने विजयश्री खेचून आणला. भाजपनं नेमलेल्या टास्क फोर्समध्ये भाजपचे नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड आणि आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता.  

आशिष शेलार आणि आशिष कुलकर्णी यांच्या खांद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मतांची आकडेमोड करण्याची धुरा दिली.  पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं योग्य त्याच पद्धतीनं पडतील याची काळजी घेतली. विरोधकांच्या गोटात काय सुरू आहे यावर शेलार आणि कुलकर्णींची विशेष नजर होती.  तीन मतांवर आक्षेप घेऊन महाविकास आघाडीवर दबाव टाकण्यातही शेलार यशस्वी झाले.
 
गिरीश महाजन आणि प्रसाद लाड  यांच्यावर अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या संपर्काची जबाबदारी होती. राज्यसभा निवडणुकीत भाजपला दहा अतिरिक्त मते मिळाली या मतांची जुळवाजुळव करण्यात महाजन आणि प्रसाद लाड यांना यश मिळालं.  अपक्ष आणि छोट्या पक्षांना संपर्क करणं, त्यांच्याकडून भाजपलाच मतदान होईल याची खात्री करणं हे मिशन या जोडगोळीला देण्यात आलं होतं.10 अतिरिक्त मतं मिळवून महाजन आणि लाड यांनी हे मिशन फत्ते केलं.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशी एक म्हण आहे.  राज्यसभा निवडणुकीत ही म्हण सत्यात उतरली आहे. महाविकास आघाडीकडे भाजपपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही ही शक्ती शिवसेनेच्या कामी आली नाही परंतु भाजपचं टीम वर्क आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युक्तीमुळे शिवसेनेला पराभवाचं तोंड बघावं लागलं.  

इतर महत्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस एकसंध; हरयाणा वगळता दोन राज्यात इतरांची फोडली मते

Sanjay Raut : 'ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे'; संजय राऊतांनी थेट नावं सांगितली

देवेंद्र भुयार म्हणाले, 'संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी पण...'

'आधी उद्धव साहेबांना विचारा, मग आरोप करा'; संजयमामा शिंदे यांचं संजय राऊत यांना उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Embed widget