प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारांची घोषणा, पंकजा मुंडे म्हणाल्या त्यांचा निर्णय योग्य
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Alliance) उमेदवारांची घोषणा केलीय. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे पंकजा मुंडे (BJP Pankaja Munde) म्हणाल्या.
Pankaja Munde : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Alliance) उमेदवारांची आज घोषणा केली आहे. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं आहे. पंकजा मुंडे आज केज विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी स्वामी समर्थ मंदिरात पूजा केल्यानंतर केज शहरांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाबद्दल विचारले होते. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी असणार का? असा प्रश्न अनेक दिवसांपासून निर्माण झाला होता. मात्र, आज स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, हा निर्णय खूप विचारांती प्रकाश आंबेडकरांनी घेतला असेल, म्हणून त्यांनी जो उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला तो योग्य असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. महादेव जानकर हे आमच्या युतीत होते आणि आता उमेदवारी पण जाहीर झाली आहे. महादेव जानकर यांना शुभेच्छा असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
ज्योती मेटे निवडणूक लढवणार असतील तर तो त्यांचा निर्णय
पंकजा मुंडे यांनी काही दिवसापूर्वी शिवसंग्राम हा भाजपचाच घटक पक्ष असल्याचे भाषणामध्ये सांगितले होते. त्यावेळी त्यांनी विनायक मेटे यांची आठवण पण करुन दिली होती. मात्र, कालच शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचे सांगितल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी अशी भूमिका घेतली हे ऐकूण मलाही आश्चर्य वाटलं. कारण, त्या सोबत आहेत हे मला माहीत होतं. पण तरीही त्यांनी जर उमेदवारीचा निर्णय घेतला असेल तर शेवटी हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचे पंकडा मुंडे म्हणाल्या.
प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत आघाडी
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक नवीन निर्णय घेतला आहे. राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नवीन आघाडी केली आहे. आंबेडकरांनी नुकतीच जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांसोबत आघाडी केल्याची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या: