Devendra Fadnavis : मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने युतीधर्म मोडला, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा
शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढवली आणि सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बनवले. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी युतीधर्म मोडला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Goa election 2022 : महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे की, शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढवली आणि सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बनवले. तुमच्या सर्व लोकांनी मोदीजींचे फोटो लावून लावून मत मागितली आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा लगावला. मागील 25 वर्षापासून शिवसेना गोव्यात निवडणूक लढवत आहे. पण एकदाही ते त्यांच्या उमेदवाराचे डिपॉजीट वाचूव शकले नाहीत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे. आदित्य ठाकेरेंना इतिहासच माहित नाही. पूर्ण ताकतीने शिवसेना गोव्यात भाजप विरुद्ध लढली. आमची मते घेऊन आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला असे फडणवीस म्हणाले. इतिहास विसरुन हे लोकं बोलतात. मागच्यावेळी मी यांना उत्तर प्रदेशचीही आठवन करुन दिली. राम जन्माच्या आंदोलनानंतर उत्तर प्रेदशमध्ये 200 जागा हे लढले होते. एकाही जागेवर हे डिपॉजीट वाचवू शकले नाहीत. उलट यांनी प्रत्येक वेळी आम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला असेही फडणवीस म्हणाले.
सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अनेक नेते गोव्यात प्रचारासाठी तळ ठोकून बसले आहेत. यातीलच एक नेते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. फडणवीस हे सध्या गोव्यात प्रचार करत असून, गोव्यात भाजपची नेमकी स्थिती काय? भाजपला गोव्यात जनतेचा प्रतिसाद मिळतोय का? भाजपसमोर नेमकी आव्हानं काय आहेत. यासंदर्भात एबीपी माझाने देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेला संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा लगावला.
महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे ना भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढले आणि सरकार काँग्रेस-एनसीपीसोबत बनवले. भाजपच्या स्टेजवर माननीय मोदीजींनी घोषणा केली भाजपच्या मुख्यमंत्र्याची, त्याला तुम्ही समर्थन दिलं. एवढचं नव्हे तर तुमच्या सर्व लोकांनी मोदीजींचे फोटो लावून लावून मत मागितली आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला. महाराष्ट्रच्या जनतेला माहीती आहे की कोणी युती धर्म मोडला असे फडणवीस यावेळी म्हणाले.
हे सरकार वाईन आणि दारु विकणाऱ्यांकरीता जेवढी संवेदनशील आहे, तितकी कोणाही करता नाही. कोविड काळात कोणालाही मदत न करणाऱ्या सरकारने बार मालकांना मदत देण्यासाठी त्यांची लायसेंस फी कमी केली. गरिबांना मदत नाही पण बार मालकांना नुकसान झालं म्हणून त्यांना मदत दिली. त्यानंतर विदेशी मद्यावरचा कर आर्धा केला. वाईन प्रोत्साहन धोरण जाहीर करुन महाराष्ट्राला मद्य राज्य बनवण्याचं काम या सरकारने केलं. मला कळत नाही की हे सरकार का असं वागतय. याला आमचा विरोध असल्याचे फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: