एक्स्प्लोर

Bihar vidhansabha Result: अजित पवारांनी सांगितलं बिहारमध्ये NDA च्या विजयाचं राज'कारण'; मोदी अन् नितीशकुमारांचं अभिनंदन

Bihar vidhansabha Result बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.'', असे अजित पवारांनी म्हटले.

मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा (Bihar vidhansabha) निवडणुकीच्या निकालात एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बिहारचे निकाल लागल्याचं दिसून येत आहे. बिहारमध्ये भाजप-जदयू आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजयी आघाडी मिळत आहे. तर, काँग्रेस-राजद महागठबंधनला केवळ 39 जागांवर विजयी आघाडी सध्या दिसून येत आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप एनडीला मोठं यश मिळाल्याने महाराष्ट्रात महायुतीचे समर्थक, नेते आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनीही या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.'', असेही त्यांनी म्हटले.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळविलेला विजय हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील जनतेच्या दृढविश्वासाचे ते प्रतीक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ''बिहारमध्ये एनडीएच्या सरकारने समाज कल्याणाच्या अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. तेथील लाडक्या बहिणींचेसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद लाभले, त्याचंच हे यश आहे. बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.'', असे अजित पवार यांनी म्हटले.

राज्याला नवी दिशा मिळेल

“हा विजय केवळ संख्याबळाचा नसून विकास, सुशासन आणि सामाजिक न्यायाच्या धोरणाचा विजय आहे. एनडीएच्या एकजुटीचा विजय आहे.त्यामुळे बिहारच्या सर्वांगीण विकासाला आणखी गती देईल आणि राज्याला नवी दिशा मिळेल. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात बिहार आणखी झपाट्याने पुढे जाईल,'' असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

अजित पवारांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला जिंकणे तर सोडा पण आघाडीही घेता आलेली नाही. बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उभा केलेल्या 15 पैकी 13 जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या या उमेदवारांना मतंही खूप कमी पडली आहेत. बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागणार आहे.

शिंदेंच्या सभा, दोन्ही उमेदवार विजयी

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. शिंदे यांनी पूर्व चंपारण्यमधील गोविंदगंज मतदार संघात लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार राजू तिवारी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली, त्या राजू तिवारी यांचा विजय जवळपास नक्की असून ते 16 हजार मतांनी पुढे आहेत. तर, कल्याणपूर मतदार संघातही भाजप उमेदवार सचिंद्रप्रसाद सिंग यांच्यासाठीही एकनाथ शिंदेंनी प्रचार सभा घेतली होती. या निकालांचे कल पाहता भाजप उमेदवार सचिंद्रप्रसाद सिंग 5 हजार मतांनी आघाडीवर असून त्यांचाही विजय जवळपास नक्की असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget