Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय, भाजप जदयूच्या विजयाचे शिल्पकार विनोद तावडेंनी यशाचं सूत्र सांगितलं
Bihar Assembly Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाचे शिल्पकार विनोद तावडे यांनी एनडीएच्या यशाचं सूत्र सांगितलं.

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपनं 94, जदयू यू 84, राष्ट्रीय जनता दल 25, लोकजनशक्ती पार्टी रामविलास 19, एमआयएम 6, राष्ट्रीय लोक मोर्चा 4, हम पार्टी 5, काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. तर, सीपीआय माले 2 जागांवर आघाडीवर आहे. बिहारमधील या ऐतिहासिक विजयानंतर भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. विनोद तावडे यांनी हा विकासाचा विजय असल्याचं म्हटलं.याशिवाय मित्रपंक्षांमध्ये असलेल्या संवादाचा आणि समन्वयाचा विकास असल्याचंही तावडे म्हणाले.
Vinod Tawde : बिहार राजकारणासाठी अवघड राज्य : विनोत तावडे
नितीशकुमार आणि भाजपचं सरकार होतं, ते सरकार सोडून नितीशजी लालू प्रसाद यांच्यासोबत चालले होते. त्यावेळी केंद्रीय नेतृत्त्वानं बिहार हे आपल्यासाठी महत्त्वाचं राज्य आहे, असं सांगितलं होतं. मी त्यावेळी हरियाणाचा प्रभारी होतो, तेव्हा मला पुढील काही वर्ष बिहारकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं. बिहार हे राजकारणासाठी अवघड राज्य आहे. महाराष्ट्रातून आलेल्या माणसासाठी खूप अवघड आहे. नितीशकुमार का गेले होते याचा अभ्यास केला. इंडी आघाडीनं त्यांची केलेली फसवणूक , त्यामुळं त्यांना पुन्हा परत आणण्याचा पक्षानं केलेला प्रयत्न होता. टीम म्हणून आम्ही काम केलं. बिहारच्या जनतेनं जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मतदान केलं. हे सगळ्यात मोठं यश आमचं आहे, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
तुम्ही प्रामाणिकपणे संवाद ठेवला तर आघाडीच्या, युतीच्या राजकारणात विश्वास असतो. तो आम्ही सातत्यानं जनता दल यूनाएटेड, चिराग पासवान यांची पार्टी, जीतनराम मांझी यांची हम पार्टी असेल, यांच्यासोबत संवाद होता. तो संवाद लोकसभा निवडणूक, जागा वाटपावेळी आम्हाला कामाला आला. एनडीएच्या जिल्हावार बैठका आणि संमेलनं घेतली. त्यात खालचा कार्यकर्ता एकमेकात मिसळला, असंही विनोद तावडे म्हणाले.
मुळात आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचा चेहरा राजस्थान, मध्य प्रदेश ना महाराष्ट्रात दिला होता. दुसऱ्या बाजूनं विरोधकांचा डाव होता. नितीशकुमार आजारी आहेत, असं सांगून विरोधात कॅम्पेन करायचं हे होऊ नये. अमित शाह यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाची वॅकन्सी नसल्याचं सांगितलं होतं, असं विनोद तावडेंनी म्हटलं.
रफ्तार पकड चुका है बिहार
रफ्तार पकड चुका है बिहार ही टॅगलाईन एनडीएससाठी महत्त्वाची ठरली. याबाबत बोलताना विनोद तावडे म्हणाले की, बिहारला जातीच्या वर काढायचं असेल तर विकासाचा मुद्दा होता. विकास सुरु केलाय हे जाणवत होतं, त्यासाठी रफ्तार पकड चुका है बिहार ही टॅगलाईन घेतली. प्रशांत किशोर हे चालणार नाहीत हे पहिल्यापासून माहिती होतं. प्रशांत किशोर यांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही, हे ठरवलं होतं, त्यानुसार आम्ही काम केलं, असं विनोद तावडे म्हणाले.
भाजप मित्रपक्षांना संपवतो हे खोटं आहे. उत्तर प्रदेशात असो, कर्नाटकात असो पक्ष तसेच आहेत.आंध्र, तेलंगणामध्ये युतीत आहोत तेव्हा तसेच आहे, असं विनोद तावडे म्हणाले.




















