एक्स्प्लोर

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असताना 'किंगमेकर' नेमकी कोणाला साथ देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीपूर्वीच (Bhiwandi Mayor Election) राजकीय वातावरण तापले असून, महायुतीमध्ये (Mahayuti) फूट आणि विरोधकांतील अंतर्गत नाराजीमुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असताना, किंगमेकरची भूमिका कोण निभावणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापालिकेतील संख्याबळ

भिवंडी महानगरपालिकेतील एकूण 90 जागांपैकी बहुमताचा आकडा 46 आहे. निवडणूक निकालानंतर विविध पक्षांचे संख्याबळ पुढीलप्रमाणे आहे.

काँग्रेस – 30 जागा

भाजप – 22 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस – 12 जागा

शिवसेना – 12 जागा

समाजवादी पक्ष – 6 जागा

कोणार्क विकास आघाडी – 4 जागा

भिवंडी विकास आघाडी – 3 जागा

अपक्ष – 1 जागा

Bhiwandi Mayor Election 2026: सेक्युलर फ्रंटला धक्का

महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र येत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची स्थापना करण्यात आली. या आघाडीकडून महापौर पदासाठी तारीक मोमीन यांचे नाव जाहीर करण्यात आले. मात्र, समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे आमदार रईस शेख यांच्यावर नाराज असल्याने त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ सोडली. समाजवादी पक्षाने थेट महापौर पदाची मागणी केल्याने आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून अद्याप या मागणीला होकार देण्यात आलेला नाही. परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आकडा 42 वरच अडकला असून, बहुमत गाठण्यात अडचण निर्माण झाली आहे.

Bhiwandi Mayor Election 2026: महायुतीतही वाद

दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून 34 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी त्यांना कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या मदतीची आवश्यकता आहे. हे सर्व घटक एकत्र आल्यास महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते. मात्र, महायुतीतही महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे आज दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती आहे.

Bhiwandi Mayor Election 2026: ‘किंगमेकर’ कोणाला साथ देणार? 

या संपूर्ण राजकीय गणितात कोणार्क विकास आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आहे. मात्र, या आघाडीचे प्रमुख विलास पाटील यांच्यावर सुरू असलेल्या पोलीस कारवाईमुळे त्यांचा महापौर पदाचा अर्ज न्यायालयीन सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे ते भाजप-शिवसेनेला मदत करणार की तटस्थ राहणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

Bhiwandi Mayor Election 2026: सत्ता कुणाची?

एकीकडे काँग्रेस समाजवादी पक्षाची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरेल का, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत वाद मिटणार का, हा मोठा प्रश्न आहे. बहुमताचा आकडा नक्की कोण गाठणार आणि भिवंडीचा महापौर कोण होणार, याबाबत सध्या तरी चित्र अस्पष्ट असून, राजकीय घडामोडींमुळे अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Ajit Pawar Death: अजितदादांच्या निधनानंतर मंत्रालयात धक्कादायक प्रकार, 75 शाळांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जाची खिरापत, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget