एक्स्प्लोर

Ajit Pawar Death: अजितदादांच्या निधनानंतर मंत्रालयात धक्कादायक प्रकार, 75 शाळांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जाची खिरापत, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

Ajit Pawar Death: अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनानंतर (Ajit Pawar Death) राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून (Minority Department) 75 शिक्षण संस्थांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच ही प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात झाल्याचे उघड झाले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, पहिले प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी, अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशीच दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी देण्यात आले. राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे.

Minority Department: चार दिवसांत 75 प्रमाणपत्रांचे वाटप

- श्री माता कन्यका सेवा संस्था – 28 जानेवारी रोजी दुपारी 3.09 वाजता प्रमाणपत्र

- सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ – 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र

- 28 जानेवारी रोजी एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्रे

- 29 व 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र वाटप

- 1 फेब्रुवारी (रविवार) – कोणतेही प्रमाणपत्र नाही

- 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्यांक दर्जा

- ऑगस्टपासून एकही प्रमाणपत्र नाही, मात्र फक्त चार दिवसांत तब्बल 75 प्रमाणपत्रे

- अनेक शाळांना शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी 6.45, 6.58 वाजता प्रमाणपत्रे

- 75 पैकी 25 शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या, त्यांनाही 29 जानेवारी या एकाच दिवशी दर्जा

- सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा

- स्वामी शांती प्रकाश व देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्रे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांनी यापूर्वी ही प्रमाणपत्रे रोखून धरली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Why do schools need minority status: शाळांना अल्पसंख्यांक दर्जा का हवा असतो?

- अल्पसंख्यांक शाळांना RTE कायदा लागू होत नाही

- 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे बंधन राहत नाही

- शिक्षकांसाठी TET परीक्षा बंधनकारक नाही

- RTI कायदाही लागू होत नाही

- शिक्षकांना पदोन्नतीमध्ये विशेष सवलत

- कोट्यवधी रुपयांच्या देणग्या व अनुदान घेण्याची मुभा

Minority Department: पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

अजित पवारांच्या निधनानंतर घाईघाईने प्रमाणपत्रे देण्यात आल्याने यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला आहे. अल्पसंख्याक विभागातील या कथित गैरकारभाराविरोधात त्यांनी उघडपणे आवाज उठवला आहे.

Minority Department: CID चौकशी व मकोका अंतर्गत कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.  “75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर CID मार्फत चौकशी करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत,” अशी मागणी त्यांनी केली.

Minority Department: 8,500 अल्पसंख्यांक शाळांची चौकशी होणार

अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया सध्या पैसे कमावण्याचा अड्डा बनली आहे, असा गंभीर आरोप करत प्यारेखान यांनी राज्यातील साडेआठ हजारांहून अधिक अल्पसंख्यांक शाळांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील सलीम जखरिया उर्दू मिडल स्कूल, पातूर आणि सय्यद गफार सय्यद हुसेन मिडल स्कूल, पातूर या शाळांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने त्यांचा अल्पसंख्यांक दर्जा रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही प्यारेखान यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा 

Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Embed widget