![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Beed : बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
Beed : बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा परिणाम थेट भाजपात पाहायला मिळाला. त्यामुळे भाजपामधील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
![Beed : बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी beed maharashtra news Affidavit of Maratha worker in BJP that he will stay with the party on direct bond marathi news Beed : बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/06/770b5218b6bca2a9dd1499cf82a9190e1730860533481358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड (Beed) जिल्ह्यात भाजपा मधील जिल्हा प्रमुखांच्या मागोमाग अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राजकीय भूमिका बदलली. यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) कारण पुढे करण्यात आलं. मात्र भाजपामधील एका मराठा कार्यकर्त्याने थेट बॉण्डवर भाजपा बरोबरच राहणार असल्याचं लिहून दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा परिणाम थेट भाजपात पाहायला मिळाला. त्यामुळे भाजपामधील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विधानसभेच्या तोंडावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र आयटी सेलचे प्रदेश शहर संयोजक संभाजी सुर्वे यांनी मात्र कोणी कुठे पण जा.. मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार... असा मजकूर थेट बॉण्ड वर लिहून पक्षश्रेष्ठीला पाठवला आहे.
संभाजी सुर्वे हे भाजपामधील मराठा कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीत जी परिस्थिती होती ती विधानसभेत देखील पाहायला मिळेल अशी शक्यता होती. त्यामुळे अनेकांनी पक्ष सोडला, मात्र मी एक मराठा म्हणून सदैव पक्षासोबत राहील अशी भूमिका सुर्वे यांनी घेतली. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाने मराठा समाजाचे वाटोळे केले आहे. शरद पवारांनी 40 वर्षात मराठा समाजाबद्दल अ देखील काढला नाही. त्यामुळे त्यांच्यावर समाज नाराज आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन 288 विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Shivadi Vidhan Sabha: उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)