बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
जिल्ह्याीतल बीड मतदारसंघातून अजित पवार गटाच्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बीड : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे चित्र स्पष्ट झालं असून 288 मतदारसंघात उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बीड (Beed) जिल्ह्यातील 6 मतदारसंघात एकूण 409 उमेदवारांनी 566 अर्ज भरले, त्यातील 33 उमेदवारांचे 61 अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये, महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज असून मनोज जरांगे समर्थकांसह मनसे, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे, बीड जिल्ह्याच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhansabha) यंदा वेगळीच रंगत दिसून येते.
जिल्ह्याीतल बीड मतदारसंघातून अजित पवार गटाच्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर यांच्यात थेट लढत होत आहे. महायुतीत पहिल्यांदाच जिल्ह्यात शिवसेना एकही जागा लढवणार नाही. आष्टीत आमदार बाळासाहेब आजबे यांनाही अजित पवार गटाने एबी फॉर्म दिला. त्यामुळे आष्टीत महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. 4 नोव्हेंबर रोजीच येथील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात प्रमुख लढती
बीड - संदीप क्षीरसागर (महाविकास आघाडी
योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी महायुती)
ज्योती मेटे (अपक्ष)
आष्टी - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी महायुती)
सुरेश धस ( भाजप महायुती)
मेहबुब शेख ( राष्ट्रवादी महाविकास आघाडी)
भीमराव धोंडे (अपक्ष)
गेवराई - विजयसिंह पंडीत (राष्ट्रवादी महायुती)
बदामराव पंडीत (राष्ट्रवादी महाविकास आघाडी
परळी - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी महायुती)
राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी महाविकास आघाडी)
केज - नमिता मुंदडा (भाजपा महायुती)
माजलगाव - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी अजित पवार)
मोहन जगताप (राष्ट्रवादी शरद पवार)
रमेश आडसकर (अपक्ष)
जिल्ह्यातून 409 उमेदवारांचे अर्ज
बीड जिल्ह्यातही 22 ते 29 ऑक्टोबर यादरम्यान उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बीड, आष्टी, माजलगाव, गेवराई, केज आणि परळी मतदारसंघातील 409 उमेदवारांनी 566 अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननीही बुधवारी पार पडली. त्यामध्ये, 33 उमेदवारांचे 61 अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले. उमेदवारी जाहीर होण्यापासून ते अर्ज दाखल करेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे, 4 तारखेला कोण कोण अर्ज माघारी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच, प्रत्येक मतदारसंघात किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे निश्चित होईल. मात्र, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना निश्चित झालाय.
हेही वाचा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट, नाव बुलेट पाटील; नवाब मलिकांविरुद्ध लढणारा महायुतीचा उमेदवार कोण?