एन्काऊंटर स्पेशालिस्ट, नाव बुलेट पाटील; नवाब मलिकांविरुद्ध लढणारा महायुतीचा उमेदवार कोण?
मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवाब मलिक तर सपाचे अबू आझमी निवडणूक लढवत आहेत.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना एबी फॉर्म दिलाय. त्यानंतर, भाजपने (BJP) आपली भूमिका स्पष्ट केली असून आपण मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले. तर, शिवसेना महायुतीकडून देण्यात आलेल्या उमेदवारासाठी भाजप काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, मुंबईतील मानखुर्द- शिवाजी नगर मतदारसंघात मोठा महायुतीत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथील मतदारसंघात नवाब मलिक (Nawab malik) यांना शिवसेना शिंदे गटाच्या बुलेट पाटील यांचे आवाहन आहे.
मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवाब मलिक तर सपाचे अबू आझमी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे बुलेट पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बुलेट पाटील हे या विभागातून नगरसेवक होते. पोलीस खात्यात आणि मुख्यत्वे क्राईम ब्रॅंचमध्ये काम करताना त्यांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी पडली होती. त्यामुळे सुरेश पाटील या नावाऐवजी त्यांना बुलेट पाटील ही ओळख मिळाली. पोलीस खात्याची नोकरी सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या ते या मतदार संघातून लढत असताना त्यांच्या समोर दिग्गज मुस्लिम नेत्यांचे आवाहन आहे.
बुलेट पाटील हे नाव कसे पडले याबाबत बोलताना पाटील म्हणाले, मी सरकारी नोकरीत असताना जे काम केल त्यावरून हे नाव पडलं. जे मी केले ते कामाचा भाग होता, चौकटीत काम करता येत नव्हते, म्हणून राजकारणात आलो, अपक्ष निवडून आलो, असेही त्यांनी सांगितले. नवाब मलिक, आबू आझमी यांना कोणी दिग्गज नेते म्हणत असतील पण मतदार आणि मी त्यांना दिग्गज म्हणत नाही, अशी टीका त्यांनी दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर केली. फॉर्म मागे घेणार का?, याबाबत बोलताना असा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, मी मैदानात उभा आहे. माझे हिंदू मुस्लिम दोघांशी चांगले सबंध आहेत, तेच माझ्या लढतीबाबत ठरवतील. मला एबी फॉर्म लढायला दिले आहे. म्हणुन मी लढणार आहे, अशी भूमिका बुलेट पाटील यांनी स्पष्ट केली.
भाजप शिवसेना मित्र पक्ष आहेत, त्यामुळे दोन्ही पक्ष माझ्यापाठी उभे राहणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. व्होट जिहाद यांसारख्या मुद्द्याकडे मी लक्ष देत नाही, 1980 सालापासून मी इथे काम करतोय, सर्व माझे जवळचे आहे, मी त्यांच्याकडे तसे पाहत नाही. सपा कार्यालयात नशापानवर बोलताना, नशेखोरी आहे तर त्यांच्या काळात काही का केले नाही. तो सपाचा वयक्तीत प्रश्न आहे, असे उत्तर पाटील यांनी दिले. दरम्यान, मी निवडून येणार हे नक्की आहे. वरुन कोणी येऊन सांगितले तरी मी अर्ज मागे घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरली, तारीख अन् ठिकाण निश्चित; 4 दिवसांत 9 सभा