एक्स्प्लोर

Sunetra Pawar: 'बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील...',बारामतीतील पाडवा उत्सवातील गर्दीवर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

Sunetra Pawar: बारामतीकारांनी दादांवर खूप प्रेम केलं आहे. दादांनी बारामतीसाठी खूप काही केलं आहे. नक्कीच बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बारामती: गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबियांची परंपरा आज बदलली गेली. बारामतीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वेगळा आणि शरद पवारांचा वेगळा पाडवा उत्सव पार पडला. शरद पवारांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. पक्षफुटीनंतर दोन गट पडलेच पण त्यानंतर आता पाडवा देखील वेगळा घेण्यात आला. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, बारामतीकारांनी दादांवर खूप प्रेम केलं आहे. दादांनी बारामतीसाठी खूप काही केलं आहे. नक्कीच बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

पहिल्यांदाच अशा पद्धतीने काटेवाडीमध्ये पाडवा साजरा करण्यात आला. मात्र, अजित दादांवर प्रेम करणारे लोकांनी प्रचंड गर्दी केली. दादांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली याचा आनंद आहे. बारामतीकारांनी दादांवर खूप प्रेम केलं आहे. दादांनी बारामतीसाठी खूप काही केला आहे. नक्कीच बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील.याच काटेवाडीच्या बंगल्यात पवारांची भाऊबीज साजरी होते. उद्या भाऊबीज आहे त्याच्यासाठी अजून नियोजन पूर्ण झालेला नाही असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. तर पवार कुटुंबियात फक्त राजकीय मतभेद आहेत. आम्ही कुटुंब म्हणून एकमेकांना भेटतो शुभेच्छा देतो आणि पवार साहेबांना देखील शुभेच्छा देऊ. मात्र, आतापर्यंत आम्ही भेटलेलो नाही असंही त्या पुढे म्हणाल्यात.

'काटेवाडीत आता दरवर्षी पाडवा साजरा होणार' - पार्थ पवार

आता दरवर्षी दिवाळीचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. पहिल्यांदाच जरी बारामतीत पाडवा दोन ठिकाणी होत असला तरी काटेवाडीच्या पाडव्याला खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे. राज्यभरातून लोक अजितदादांना भेटण्यासाठी आले आहेत याच्या वरूनच आपण अंदाज लावू शकता लोक कुणासोबत आहेत. याच्यापुढे दरवर्षी बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा केला जाणार अजित पवार हे काटेवाडीमध्येच दिवाळीचा पाडवा साजरा करणार असल्याचं पार्थ पवारांनी म्हटलं आहे. तर अजित दादांची आणि शरद पवारांची विचारधारा ही वेगळी आहे म्हणून आता पक्ष वेगळं झालं आहे. निवडणूक आहे त्यामुळे भाऊबीज देखील आम्ही लोकांसोबतच साजरी करणार आहोत, लोकांमध्ये संभ्रम नको असंही पुढे पार्थ पवार म्हणालेत. 

पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा

गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण पवार कुटुंब ‘गोविंदबाग’ या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीत पाडवा साजरा करत आलं आहे. दिवाळी पाडव्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते एकत्र येत, शुभेच्छा देत.

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Embed widget