एक्स्प्लोर

युतीच्या लफड्यात बहुजन विकास आघाडीची मात्र घुसमट, आघाडीकडून मित्रत्त्वाचा हात?

सत्तेत एकत्र नांदत असतानाही बविआला अशा प्रकारच्या वागणुकीला समोरे जावे लागले. त्यातच आता नाराज शिवसेनेला खूश करण्यासाठी पालघरची जागाही बहाल करत बविआला बाजूला ठेवले आहे.

पालघर : लोकसभा निवडणुकीचे सनई चौघडे वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये सध्या जोरदार आघाडी आणि युतीच्या मोर्चेबांधण्या सुरु आहेत. सत्तेत एकत्र नांदूनही एकमेकांवर बोचरी टीका करणाऱ्या शिवसेना-भाजपाने युतीचा निर्णय घेतला आहे. पण सत्तेत सोबत असलेल्या बहुजन विकास आघाडीला वाऱ्यावर सोडले. त्यामुळे बविआ पुन्हा एकदा आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून नशीब आजमावणार आहे. शिवाय आघाडीकडूनही पालघर लोकसभेची जागा बविआसाठी सोडून मित्रत्वाचा हात पुढे करण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत घडामोडींचा वेध घेतल्यास युतीच्या लफड्यात वसईतील स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीची मात्र घुसमट होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांनावर जोरदार टीका करत उणेंधुणे काढले होते. पण यावेळी जागा वाटपाचा भाजपा-शिवसेनेत समझोता होऊन लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनोमिलन झाले आहे. लोकसभेच्या 25 जागा भाजप आणि 23 जागांवर शिवसेना या फॉर्म्युल्यावर दिलजमाईने तडजोड झाली आहे. या सर्व युतीच्या भानगडीत सध्या सत्तेत सोबत असलेल्या बहुजन विकास आघाडीला मात्र वेटिंगवर ठेवण्यात आले. त्यातच पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्याचे समजते. त्यामुळे बविआचा अपेक्षाभंग झाला आहे. पोटनिवडणुकीतही भाजपाने बविआचा भावनाविवश करत उमेदवार उभा केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसईत येऊन बविआ वर जहरी टीका केली होती. तसेच हक्काच्या उत्तर भारतीय मतदारांना चुचकारण्याचा  प्रयत्न  केला होता. मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून बविआची कोंडी केली होती. सत्तेत एकत्र नांदत असतानाही बविआला अशा प्रकारच्या वागणुकीला समोरे जावे लागले. त्यातच आता नाराज शिवसेनेला खूश करण्यासाठी पालघरची जागाही बहाल करत बविआला बाजूला ठेवले आहे. आता युतीचा निर्णय झाल्याने बविआलाही आपली मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. आघाडीनेही बविआसाठी पालघर मतदारसंघ सोडला असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. राजेंद्र गावित भाजपात गेल्याने आघाडीकडेही सध्या तुल्यबळ उमेदवार नाही. दुसरीकडे पोटनिवडणुकीत दुसऱ्या स्थानी राहिलेले तसेच अनुभवी  माजी खासदार बळीराजा जाधव हे बविआकडे पर्यायी उमेदवार आहेत. त्यामुळे बविआला पालघर मतदार संघ सोडण्याबाबत विचार आघाडीमध्ये सुरु आहे. वसईत बविआचा मतदारांवर प्रभावही आहे. सध्या बविआच्या ताब्यात वसई विरार महापालिका आहे. तसेच जिल्ह्यातील तीन मतदार संघात तीन आमदार आहेत. वसई पंचायत समितीही बविआकडे आहे. वास्तविक बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्या वीस वर्षांचे मित्रत्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्तांतरानंतर बविआने भाजपाशी जुळवून घेत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपाशी जुळवून घेताना हितेंद्र ठाकूर यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यातच युतीचा निर्णय झाल्याने हितेंद्र ठाकूर यांना स्वतंत्रपणे लढण्याची मोकळीक मिळाली आहे. शिवसेना-भाजपा-बविआ अशी युती होणे अशक्य आहे. शिवाय भाजपाला हितेंद्र ठाकूर यांना रोखूनही धरता येणार नाही. तसेच युती झाल्याने बविआचीही चिंता वाढली असली तरी युतीलाही गाफील राहता येणार नाही. त्यामुळे यावेळीही पालघर मतदारसंघात तुल्यबळ लढतीची अपेक्षा आहे. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघातील सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये युतीची घोषणा झाल्यावरही मोठ्या प्रमाणात ताटातूट आहे. त्यामुळे ह्याचा फायदा आघाडी प्रणित बहुजन विकास आघाडीला होऊ शकते यात शंका नाही. परिणामी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी स्थिती पालघर लोकसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget