एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमधून दिलीप बोरसेंचा एक लाखाहून अधिक मतांनी दणदणीत विजय, मविआच्या दीपिका चव्हाण पराभूत

Baglan Vidhan Sabha Constituency : 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या दिलीप बोरसे यांनी दीपिका चव्हाण यांचा पराभव केला होता. दिलीप बोरसे यांना 94,683 मतं मिळाली होती, तर दीपिका चव्हाण यांना 60,989 मतं मिळाली होती.

Baglan Vidhan Sabha Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाचा टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. नाशिकच्या बागलाण विधानसभा मतदारसंघात (Baglan Assembly Constituency) महायुतीत (Mahayuti) भाजपने (BJP) पुन्हा एकदा विद्यमान आमदार दिलीप बोरसे (Dilip Borse) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar Group) दीपिका चव्हाण (Dipika Chavan) यांना उमेदवारी दिली. बागलाणमध्ये दिलीप बोरसे विरुद्ध दीपिका चव्हाण यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. विसाव्या फेरी अखेर भाजप महायुतीचे दिलीप बोरसे 129638 मतांनी विजयी झाले.

बागलाण मतदार संघ हा चाळीस वर्षापूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आणि त्यानंतर या मतदार संघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आले. बागलाण विधानसभा मतदारसंघात सुमारे 40 टक्के आदिवासी जनता आहे. दलित समाजाचा व्होटर शेअर सुमारे पाच टक्के आहे. मुस्लिम समुदायाचा सुमारे 2.5 टक्के आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांची स्थिती पाहिल्यास, 90 टक्के ग्रामीण आणि 10 टक्के शहरी मतदार आहेत. 

दिलीप बोरसे विरुद्ध दीपिका चव्हाण थेट लढत 

सध्या बागलाण विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांच्या ताब्यात आहे. यापूर्वी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांचा कब्जा होता. 2009 मध्ये उमाजी मंगळू बोरसे यांनी या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून 1962 ते 1990 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जात होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या दिलीप बोरसे यांनी दीपिका चव्हाण यांचा पराभव केला होता. दिलीप बोरसे यांना 94,683 मतं मिळाली होती, तर दीपिका चव्हाण यांना 60,989 मतं मिळाली. भाजपच्या दिलीप बोरसे यांनी मोठ्या मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका यांना पराभूत केले होते. यंदा पुन्हा एकदा दिलीप बोरसे आणि दीपिका चव्हाण यांच्यात लढत झाली. दिलीप बोरसे यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. दिलीप बोरसे यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

आणखी वाचा 

Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Embed widget