Ausa Vidhan Sabha constituency : औसा मतदारसंघात अभिमन्यू पवारांविरोधात दिनकर माने मैदानात, कोण मारणार बाजी?
आज आपण औसा विधानसभा मतदारसंघाची (Ausa Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने निवडणूक लढवत आहेत.
Ausa Vidhan Sabha constituency : विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. आज आपण औसा विधानसभा मतदारसंघाची (Ausa Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने ( Dinkar Mane) निवडणूक लढवत आहेत.
औसा विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी मानली जात आहे. कारण या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे निवडणूक लढवत आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून दिनकर माने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांमधील लढत ही अत्यंत चुरशीती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघात काय झालं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बसवराज महाद्वाराव पाटील यांचा 26714 मतांच्या फरकाने पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अभिमन्यु पवार यांना 95340 मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे बसवराज माधवराव पाटील यांचा 68626 मतांनी पराभव केला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार बजरंग जाधव होते. मात्र, यावेळी लोकसभा निवडुकीपूर्वी बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुलं या मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याची चर्चा मतदारसंघात सुरु होती. मात्र, अखेर ठाकरे गटाचे दिनकर माने मैदानात उतरले आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो कारण इथे काँग्रेसने अनेक वेळा विजय मिळवला आहे. औसा हे शहर लातूर महानगरापासून साधारणपणे 20 किमी अंतरावर आहे. येथे एक ऐतिहासिक किल्ला आहे. जो सध्या अवशेषांच्या रुपात उभा आहे. वीरनाथ महाराज यांचे एक मोठे पूजास्थळ देखील आहे. जे त्यांच्या वंशज मल्लीनाथ महाराज यांनी साधारणपणे 3 शतकांपूर्वी बनवले होते. औसा तालुक्यात सुमारे 2 लाखांहून अधिक ग्रामीण लोकवस्ती आहे.
दरम्यान, औसा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सुधाकर तुकाराम श्रांगारे यांचा 61881 मतांनी पराभव करून विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या: