Atul Bhosale Profile : सलग 3 पराभवानंतर चौथ्या निवडणुकीत विधानसभेत एन्ट्री, पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची धूळ चारणारे अतुल भोसले कोण आहेत?
Atul Bhosale Profile : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजप नेते अतुल भोसले यांचा पराभव केलाय.
![Atul Bhosale Profile : सलग 3 पराभवानंतर चौथ्या निवडणुकीत विधानसभेत एन्ट्री, पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची धूळ चारणारे अतुल भोसले कोण आहेत? Atul Bhosale Profile Who is Atul Bhosale who defeated Prithviraj Chavan in the fourth election after 3 consecutive defeats Maharashtra Vidhansabha Election Maharashtra Politics Marathi News Atul Bhosale Profile : सलग 3 पराभवानंतर चौथ्या निवडणुकीत विधानसभेत एन्ट्री, पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची धूळ चारणारे अतुल भोसले कोण आहेत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/1f2bd9fa6617de8eba352a18cacf45761732461809275924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Atul Bhosale Profile, कराड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना देखील विधानसभा निवडणुकीत अपयश आलं आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अतुल भोसले (Atul Bhosale) यांना तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट देण्यात आले होते. या निवडणुकीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. अतुल भोसले यांनी यापूर्वी दोन वेळेस पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोण आहेत अतुल भोसले ?
भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे प्रदेश चिटणीस,
अध्यक्ष - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर
प्रदेश चिटणीस - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र
निमंत्रित सदस्य - जिल्हा नियोजन समिती सातारा
जिल्हा प्रभारी - सांगली जिल्हा व सांगली ग्रामीण भाजपा
चेअरमन - कृष्णा सहकारी बँक लि.रेठरे बुद्रुक
आता नवनिर्वाचित आमदार कराड दक्षिण
कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्याविषय सुविधा उपलब्ध केली
गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये अतुल भोसलेंचा पराभव
गेल्या तीन निवडणुकांमध्ये अतुल भोसले यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र यावेळी कराड दक्षिण जागेवर महायुतीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. या मतदारसंघात काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. तर अतुल भोसले यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रचार केला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय होतं चित्र?
महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला होता. पृथ्वीराज चव्हाण एकूण 92,296 मते मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.अतुल भोसले यांना एकूण 83,166 मते मिळाली होती.. यामुळे अतुल भोसले दुसऱ्या स्थानावर राहिले आणि 9,130 मतांनी त्यांचा पराभव झाला.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना 76 हजार 831 मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर विलासराव पाटील यांना 60 हजार 413 मते मिळाली होती. याशिवाय भाजपचे अतुल सुरेश भोसले तिसऱ्या क्रमांकावर होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)