Election Results Live Updates: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा
विधानसभा निवडणूक 2018 निकाल : भाजपच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड खेचून आणण्यात काँग्रेसला यश आलं आहे, तर मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे, तर मिझोरम मात्र काँग्रेसच्या हातून निसटलं. मिझोरम नॅशनल फ्रन्ट मिझोरममध्ये सत्तास्थापन करत आहे.
Election Results Live Update
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये अद्याप कोणत्याही पक्षाला बहुमात मिळालेले नाही, तरिही काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा, आज रात्री भेटण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितली. तेलंगणा : तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) 88 जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर काँग्रेसने 19 जागा, एमआयएमने 7, टीडीएसने 2, ऑल इंडिया फॉरर्वड ब्लॉकने 1 आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे. मिझोरम : मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) 26 जांगासह स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला 5 जागांवर आणि भाजपवला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर 8 अपक्ष उमेदवार याठिकाणी निवडून आले आहेत. राजस्थान : राजस्थानच्या वसुंधरा राजे शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान : सत्ता स्थापनेबाबत बोलण्यासाठी आम्ही राज्यापालांकडे भेटण्याची वेळ मागितली आहे. त्यांनी उद्या भेटण्याची वेळ दिली आहे - राजस्थान कांग्रेसचे जनरल सेक्रेटरी सुशील शर्मा राजस्थान , छत्तीसगड, मध्य प्रदेश : विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन केलं. तेलंगणा, मिझोरम : तेलंगणात जिंकलेल्या केसीआर गारु आणि मिझोरममध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या एमएनएफचंही अभिनंदन मोदींनी केले मध्य प्रदेश : खूप कमी मतांच्या फरकामुळे मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार आक्षेप घेत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमधील अंतिम निकालास उशीर होत आहे. मध्य प्रदेश : मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस पुन्हा आघाडीवर मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपची रस्सीखेच सुरुच, भाजप एका जागेने आघाडीवर आहे. राजस्थान , मध्य प्रदेश : राजस्थानमध्ये तब्बल 11 मंत्री पराभूत, तर मध्य प्रदेशमध्ये 12 मंत्री पिछाडीवर राजस्थान : राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचे नाव उद्या जाहीर होणार मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी आमच्या सोबत असल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार : काँग्रेस खासदार राजीव सातव राजस्थान : राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे या दोघांची नावे चर्चेत देशातील जनता भाजपला मतदान करणार नाही : राज ठाकरे देशाला राम राज्याची गरज आहे, राम मंदिराची नाही : राज ठाकरे मोदी सरकारची उलटी गिनती सुर झाली आहे : अरविंद केजरीवाल छत्तीसगडमधील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणार : रमणसिंग मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ यांचं तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांचं नाव चर्चेत पाच राज्यातले निकाल पाहता शिवसेना अाणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढण्याची हिंमत करणार नाही, आजपासूनच ते हनिमूनची तयारी करतील : जितेंद्र आव्हाड मध्य प्रदेशात बहुमत जमवण्याची जबाबदारी दिग्विजय सिंह यांच्याकडे : सूत्र मोदींचा प्रभाव संपला हे सिद्ध, धनशक्तीवर जनशक्तीचा विजय, 2019 लोकसभा निवडणुकांत देशात काँग्रेसचीच सत्ता, मोदी जातील आणि राहुल गांधी येतील : अशोक चव्हाण दुपारी तीन वाजेपर्यंत NOTA ची आकडेवारी छत्तीसगड : 1 लाख 33 (2.2 टक्के) मतं NOTA ला राजस्थान : 3 लाख 31 हजार मतदारांची (1.5 टक्के) पसंती NOTA ला मध्य प्रदेश : 2 लाख 42 हजार (1.5 टक्के) मतं NOTA ला तेलंगणा : 1 लाख 69 हजार (1.1 टक्के) मतं NOTA ला मिझोरम : 2 हजार 785 (0.5 टक्के) मतं NOTA ला 'करो राजतिलक की तयारी , आ रहे है नितीन गडकरी' भाजपच्या गोटातून सोशल मीडीयावर मेसेज व्हायरल मध्य प्रदेश : दोलायमान स्थिती कायम; भाजप 113, काँग्रेस 107, इतर 10 "करो राजतिलक की तैयारी, आ रहें हैं नितीन गडकरी," सोशल मीडियावर मेसेज व्हायरल राजस्थान : काँग्रेस बहुमताजवळ, अशोक गहलोत यांच्याकडून चहाचं वाटपलोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्याच्या वर्षपूर्तीलाच त्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना काँग्रेसने मोठा हादरा दिला. सतत पाच वर्षांनी सत्तापालटाचा राजस्थानचा ट्रेण्ड कायम राहिला आहे. राजस्थानमध्ये भाजपने कडवी झुंज दिली असली, तरी काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांचं सरकार काँग्रेसने केवळ खालसाच केलं नाही, तर भाजपचा सुपडासाफ झाला. मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये कांटे की टक्कर रंगली. तेलंगणामध्ये टीएसआरच्या के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. मिझोरममध्ये सत्तापालट झाले असून तीन मोठ्या राज्यात मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसने आपल्या हातून मिझोरमची सत्ता गमावली आहे. मिझोरम नॅशनल फ्रन्टने मिझोरममध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या 8 हजार 500 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स)मध्ये बंद झालं होतं. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
मध्य प्रदेश : 19 जागांवर 500 मतांसाठी ओढाताण, सत्ताकारण याच 19 जागा ठरवणार तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 50 हजार मतांच्या फरकाने विजयी#AssemblyElection2018 : राजस्थान : काँग्रेस बहुमताजवळ, अशोक गहलोत यांच्याकडून चहाचं वाटप https://t.co/vbdfHLvDIs #ABPResults #मोदींचीपरीक्षा pic.twitter.com/Xj7lVV5urQ
— ABP माझा (@abpmajhatv) December 11, 2018
पाच राज्याच्या निकालांवर प्रतिक्रिया देणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं, अधिकृत निकाल आल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार, काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया हे मतदान मोदी सरकार आणि भाजपविरोधात आहे, हाच ट्रेण्ड 2019 मध्येही कायम राहणार : पृथ्वीराज चव्हाण मध्य प्रदेश : समाजवादी पक्ष काँग्रेसच्या समर्थनार्थ मध्य प्रदेश : बसप अध्यक्षा मायावतींनी विजयी आमदारांना दिल्लीला बोलावलं, भाजपला समर्थन न देण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती छत्तीसगड : रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर, माजी मुख्यमंत्री अजित जोगींची मोठ्या विजयाकडे वाटचाल राम मंदिर सोडा आणि विकासाचा मार्ग धरा, सहयोगी खासदार संजय काकडे यांचा भाजपला घरचा आहेर राजस्थान : भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज, राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार : सचिन पायलटमिझोरम छोटं राज्य असलं तरी या राज्याचा निकाल 2019 साठी महत्त्वाचा संकेत आहे. ज्या ईशान्य भारतातील ७ राज्यामध्ये स्वातंत्र्य काळापासून काँग्रेसचा प्रभाव होता,तिथून काँग्रेस पूर्णपणे हद्दपार झालीय.१९ ला ज्या ठिकाणी भाजप जागा भरून काढण्यासाठी प्रयत्न करतंय, त्यादृष्टीने हे मोठे यश.
— prashant kadam (@_prashantkadam) December 11, 2018
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेत भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक राजस्थान : काँग्रेस आघाडीवर परंतु बहुमतपासून दूर, सत्तास्थापनेसाठी सचिन पायलट आठ अपक्षांच्या संपर्कात हा काँग्रेसचा विजय नाही, पण जनतेने भाजपला धडा शिकवला : संजय राऊत राजस्थान : काँग्रेसमुक्तीची भाषा करणारे मुक्त होतील : अशोक गहलोत मध्य प्रदेश : पुन्हा चित्र बदललं, भाजप 103, काँग्रेस 115 आणि इतर 12 मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या सत्तास्थापनेच्या हालचाली, अपक्ष-इतरांमधील 10 उमेदवार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा मिझोरमचे मुख्यमंत्री ललथनहवला यांना पराभवाचा धक्का, मिझोरम नॅशनल फ्रन्टच्या उमेदवाराकडून हार काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारल्याच्या वर्षपूर्तीला राहुल गांधींना मोठं गिफ्ट, राहुल गांधींच्या नेतृत्वात छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात पक्षाला मोठं यशछत्तीसगड : रायपूरमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष @7_ganesh #मोदींचीपरीक्षा #ABPResults #AssemblyElection2018 https://t.co/vDBNLeVqoz
— ABP माझा (@abpmajhatv) December 11, 2018
सकाळी 10.55 वाजता मध्य प्रदेश : भाजप 99, काँग्रेस 117, इतर 14 राजस्थान : भाजप 82, काँग्रेस+99, इतर 18 छत्तीसगड : भाजप 26, काँग्रेस 57, इतर 7 तेलंगणा : टीआरएस 82, काँग्रेस+28, भाजप 2, इतर 7 मिझोरम : भाजप 1, काँग्रेस 7, एमएनएफ 27, इतर 5 ---------------------------- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानात काँग्रेस बहुमताकडे तेलंगणामध्ये एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयीनिकालाच्या दिवशी भाजप मुख्यालयातलं चित्र..२०१४नंतर जवळपास प्रत्येक निवडणुकीवेळी भव्य मंडप, देशभरातल्या कार्यकर्त्यांची गर्दी, निकालानंतर पुष्पवृष्टी चा वर्षाव झेलत पंतप्रधान मोदी येणार, प्रत्येक निकालानंतर देशाला संबोधित करणार ही इथली सवय बनली होती..आज शुकशुकाट आहे. pic.twitter.com/6P5jeJ0I3J
— prashant kadam (@_prashantkadam) December 11, 2018
राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमत, सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसच्या शतक पार जागा मध्य प्रदेशमध्ये बसप आठ जागांवर आघाडीवर, बसप किंगमेकरच्या भूमिकेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आघाडीवर राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आघाडीवर, भाजपचे युनूस खान मागे तेलंगणात टीआरएसला स्पष्ट बहुमताचे संकेत, भाजपचा सुपडासाफ शेअर बाजारातली घसरण सुरुच, सेन्सेक्स 500 अंकांनी गडगडला राजस्थानमध्ये भाजप सरकारचे सात मंत्री पिछाडीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग पिछाडीवर शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 374 अंकांनी गडगडला तेलंगणात अकबरुद्दीन ओवेसी आघाडीवर राजस्थानमध्ये काँग्रेसची हाफ सेंच्युरी, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर चार राज्यांमध्ये काँग्रेस पुढे, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणातही काँग्रेसची मुसंडी मध्य प्रदेशचा पहिला कल, काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर राजस्थानचा पहिला कल भाजपच्या बाजूने, वसुंधरा राजे आघाडीवर, सचिन पायलटही पुढे ??%दिल्लीत कॉंग्रेस मुख्यालयाच्या बाहेर लागलं नवं पोस्टर...'टूट गयी विकास की डोर, वापस चलो काँग्रेस की ओर...' pic.twitter.com/7WMtp1qTGx
— prashant kadam (@_prashantkadam) December 11, 2018