एक्स्प्लोर

Assembly Election 2022 : निवडणूक प्रचारांचा आज सुपर संडे; अमित शाह, प्रियांका गांधी पंजाबमध्ये; तर उत्तर प्रदेशात योगी-अखिलेश यांच्या जनसभा

Assembly Election 2022 : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज प्रचार सभांसाठी पंजाबमध्ये उपस्थित असणार आहेत. ते बाराबंकी आणि रायबरेलीच्या लोकांशी संवाद साधतील. तर प्रियांका गांधीही पंजाब दौऱ्यावर आहेत.

Assembly Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतशी सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचाराचा वेग वाढवला आहे. या क्रमवारीत आज म्हणजेच, रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंजाबमध्ये एनडीए आघाडीचा प्रचार करणार आहेत. अमित शाह पतियाळा, लुधियाना आणि अमृतसरमध्ये युतीच्या उमेदवारांसाठी मतं मागणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ते लुधियानामध्ये दुपारी 12.15 वाजता जनतेला बोलण्यासाठी आणि मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत. त्याचवेळी शाह दुपारी 1.45 वाजता पटियाला येथे पोहोचतील आणि तेथे जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर शाह संध्याकाळी 5.30 वाजता अमृतसरला पोहोचतील आणि जाहीर सभेला उपस्थित राहतील. 

संरक्षण मंत्र्यांचा पंजाब दौरा 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही आज पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाब दौऱ्यावर असणार आहेत. ते बाराबंकी आणि रायबरेलीच्या लोकांशी खास बातचित करतील. ते दुपारी तीन वाजता जगतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करौती मैदानावर भाजप उमेदवार अमरपाल मौर्य यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करतील. याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दुपारी 12.20 वाजता रामनगर, दुपारी 2.00 वाजता हैदरगड आणि 3.35 वाजता उंचाहार येथे जाहीर सभा घेणार आहेत.

योगी आदित्यनाथही जनसभा घेणार 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सकाळी 11.30 वाजता निवडणूक रॅलीत जालेसरचे उमेदवार संजीव दिवाकर आणि जलेसर विधानसभा जागेसाठी एटामधील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतील. एमजीएम इंटर कॉलेज, जलेसर येथे ही जाहीर सभा होणार आहे. याशिवाय योगी लखनौच्या अमौसी विमानतळावर सकाळी 10.40 वाजता आणि आग्रा येथील खेरिया विमानतळावर सकाळी 11.30 वाजता पोहोचतील. सीएम योगी आज एटा, फारुखाबाद, औरैया येथे अनेक रॅली आणि जाहीर सभांना उपस्थित राहणार आहेत.

प्रियांका गांधींचा पंजाब दौरा 

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही आज पंजाब दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्या राज्यातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. प्रियांका आज कोटकपुरा, डेराबस्सी आणि धुरी या तीन ठिकाणी निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ती सकाळी 10.30 वाजता भटिंडा येथे उतरणार आहे. त्यानंतर रात्री 11 वाजता कोटकपुरा, दुपारी 1 वाजता धुरी आणि 3.30 वाजता डेराबस्सी येथे जाहीर सभांना संबोधित करून संध्याकाळी 6.30 वाजता त्या चंदीगडहून दिल्लीला परततील.

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात करणार अखिलेश यादव 

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचा हाथरस, कासगंज, एटा आणि फिरोजाबादचा दौरा आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान क्षेत्रात प्रचार करणार आहे. आज सकाळी लखनौ विमानतळावरून ते हाथरसला रवाना होतील. सपा अध्यक्ष अखिलेश यादव कासगंज, एटा आणि फिरोजाबादमध्ये संध्याकाळी निवडणूक जनसंपर्क करणार आहेत. यानंतर ते संध्याकाळी उशिरा लखनौला परततील.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget