Ashok Chavan : मला संपवण्याची भाषा केली, अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यावचं लागतं, अशोक चव्हाण कडाडले
Ashok Chavan, नांदेड : मला संपवण्याची भाषा केली, अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यावचं लागतं, असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
Ashok Chavan, नांदेड : युद्धात उतरल्यावर समोर जाऊन विरोधकांच्या चुकीच्या आरोपांना उत्तर देणं गरजेचं होतं. मला संपवण्याची भाषा केली. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे मत भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. माझे पेशन्स कायम आहेत, मी संयमाने काम करतो. फार कोणी माझ्या अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यावचं लागतं असेही चव्हाण म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातील मुदखेड येथे शेवटची प्रचार सभा घेत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी एबीपी माझाशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, युद्धात उतरल्यावर समोर जाऊन विरोधकांच्या चुकीच्या आरोपांना उत्तर देणं गरजेचं होतं. मला संपवण्याची भाषा केली. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे मत भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. माझे पेशन्स कायम आहेत, मी संयमाने काम करतो. फार कोणी माझ्या अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यावचं लागतं असेही चव्हाण म्हणाले. तर भोकर मतदारसंघात जनतेचा प्रतिसाद आणि प्रेम मिळालं आहे. भोकर मतदारसंघातील जनता ही माझ्या कुटुंबातील असल्याचे उमेदवार श्रीजया चव्हाण म्हणाल्या.
रेवंत रेड्डींनी पक्षनिष्ठा शिकवू नये
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील जाहीर सभेत अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. गद्दार आणि धोकेबाज अशा शब्दांचा वापर त्यांनी अशोक चव्हाण यांच्या बद्दल केला होता. अशोक चव्हाण यांनी रेवंत रेड्डी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रेवंत रेड्डी यांच्याकडून पक्षनिष्ठेचे धडे घेण्याची मला गरज नाही. त्यांचा इतिहास नांदेडच्या जनतेला माहीत नाही, मला माहीत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. आरएसएस आणि तेलुगू देसमला दगा देऊन काँगेसमध्ये आलेल्या रेवंत रेड्डी यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये असं अशोक चव्हाण म्हणाले.
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही
"अशोक चव्हाण यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहित नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत. त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा" असं रेवंत रेड्डी म्हणाले होते. या वक्तव्याला देखील अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. पैशाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत नाही. काँगेसने काय थैमान घातलंय ते पाहा जरा, असं अशोक चव्हाण म्हणाले. व महाराष्ट्रात तेलंगणाचा पैसा आलेला आहे. हा उद्योग सुरू झालेला आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असं अशोक चव्हाण म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?