एक्स्प्लोर
अजहर मसूद हा मौलाना नसून सैतान आहे : असदुद्दीन ओवेसी
पुलवामा हल्ल्यावरुन एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पुलवामा हल्ल्याला पाकिस्तान आणि आयएसआय जबाबदार आहेत. मात्र पुलावामामध्ये 200 किलो आरडीएक्स आलं कुठुन? गुप्तचर यंत्रणा बिर्याणी खायला गेली होती का?
मुंबई : 'ना मोदी, ना राहुल अब की बार सिर्फ प्रकाश आंबेडकर', अशी घोषणा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील शिवाजी पार्कमधील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारसह काँग्रेस, राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला. दरम्यान व्यासपीठावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील, एमआयएमचे आमदार वारिस पठान उपस्थित होते.
अजहर मसूद हा मौलाना नसून सैतान आहे
पुलवामा हल्ल्यावरुन एमआयएम अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पुलवामा हल्ल्याला पाकिस्तान आणि आयएसआय जबाबदार आहेत. मात्र पुलावामामध्ये 200 किलो आरडीएक्स आलं कुठुन? गुप्तचर यंत्रणा बिर्याणी खायला गेली होती का? असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. शिवाय दहशतवादी अजहर मसूद हा मौलाना नसून सैतान आहे, असं ओवेसी म्हणाले.
UNCUT | वंचित बहुनज विकास आघाडीची पहिली सभा, एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझा
आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली. आर्थिक मुद्द्यावर दिलेलं आरक्षण चुकीचं आहे. कोळी, धनगर, दलित, मुस्लिम या समाजाला 70 वर्षांपासून न्याय मिळालेला नाही, असं ओवेसी म्हणाले. यावेळी त्यांनी काँगेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेसने त्यांच्या काळात मुस्लिम समाजावर अन्याय केला. मुस्लिमांना त्रास दिला आणि मुस्लिम तरुणांना तुरुंगात टाकल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.
महाआघाडी आणि मोदी दोन्ही भेसळ आहे. आमचं गठबंधन ऑरगॅनिक आहे, असं ओवेसी म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहावे. अबकी बार ना मोदी, ना राहुल. अबकी बार फक्त प्रकाश आंबेडकर, अशी घोषणा यावेळी ओवेसींनी दिली. शिवाय त्यांनी मुस्लिम समाजाला प्रकाश आंबेडकरांना मतदान करा, असं आवाहन केलं.
फडणवीस, पवार, ठाकरे हे तुम्हाला न्याय देणार नाही. कारण हे सर्व पेशवे आहेत. तुम्हाला आंबेडकरचं न्याय देतील. कालपर्यंत उद्धव ठाकरे म्हणत होते, भाजपसोबत जाणार नाही. मात्र भाजपने कोणती पुडी उघडली आणि भाजपसोबत गेले, असा सवाल ओवेसी विचारला.
उद्या काँग्रेस, राष्ट्रवादीचे चमचे येतील आणि वंचित बहुजन आघाडी मतं विभाजन करण्यासाठी तुम्हाला बोलतील. मोदी, फडणवीस, ओवेसी जातीयवादी आहे, असा आरोप करतील. मात्र तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असं ओवेसी म्हणाले.
उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी चमचे येतील आणि तुम्हाला बोलतील वंचित बहुजन आघाडी मतं विभाजन करतील. मोदी, फडणवीस ओवेसी जातीयवादी आहे, असा आरोप करतील. मात्र तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असं ओवेसी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement