एक्स्प्लोर

INDIA Alliance: दिल्लीत आपचा स्वबळाचा नारा! महाराष्ट्रात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मविआतील पक्ष देणार 'एकला चलो'चा नारा?

INDIA Alliance: 'आप'ने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हात सूर प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचा असेल का?

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे. खरं तर इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी होऊन दिल्लीची निवडणूक एकत्रित लढली जाईल  अशी चर्चा असताना 'आप'ने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हात सूर प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचा असेल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पाहूया त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट.

एक्स पोस्ट अरविंद केजरीवाल 

दिल्लीत आपली सत्ता असलेल्या आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीत असून सुद्धा आपली ताकद पाहून काँग्रेससोबत आघाडी न करता स्वबळाचा नारा दिला आहे. पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची ठरवली आहे. त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे कोणासोबत आघाडी करणार नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एक्स मधील पोस्ट वरून सांगितलं आहे.

काँग्रेसचा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत नडला

आता हाच विचार आगामी मुंबई महापालिकासह महाराष्ट्र इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने केल्यास त्यात नवल वाटायला नको. कारण महाविकास आघाडीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी अशा प्रकारचा काही पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा सूर असल्याचं मागे झालेल्या काही बैठकांमधून समोर आलं. तर पराभूत उमेदवारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंसमोर स्वबळाची भूमिका भविष्यातील पक्षाच्या रणनीतीसाठी समोर मांडली. इतकंच काय तर विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा खापर काँग्रेसवर फोडत काँग्रेसचा आत्मविश्वास  विधानसभा निवडणुकीत नडला असं ठाकरेंच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं. 

मुंबई महापालिकेत मागील पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुद्धा मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेने तीन खासदार आणि दहा आमदार निवडून आणले त्यामुळे पक्षाची मुंबईत ताकद अजून सुद्धा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मुंबई महापालिकेची निवडणूक न लढता "आप"सारखा मुंबईच्या महापालिका निवडणुकीत सुद्धा स्वबळाचा नारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिला जाऊ शकतो.मात्र याबाबत अद्याप कुठलाही निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नाही. याबाबत चाचपणी करून  आणि कार्यकर्ता पदाधिकारी आणि स्थानिक पातळीवरील  परिस्थिती लक्षात घेऊन  हा निर्णय घेण्यातील असं सांगण्यात येतंय. तर हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने या बीएमसी निवडणुकीत तळागाळात पोहोचवण्याची तयारी  ठाकरेंच्या शिवसेनेने केली असल्यामुळे  समाजवादी पक्षाप्रमाणे मविआतील इतर दोन पक्ष दुरावणार का? हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकत्रित लढून लोकसभेत मिळालेलं यश आणि विधानसभेत झालेला पराभव. या सगळ्याचा विचार करून मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील  शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा आम आदमी पार्टी प्रमाणे स्वबळाचा नारा देणार? एकत्रित येऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने निवडणुकांना सामोरे जाणार हे निवडणुका जाहीर झाल्यानंतरच कळेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Accident Car Airbag Death : कारमध्ये मुलांना पुढं बसवताय? हा व्हिडीओ पाहा Special ReportTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 24 December 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Cabinet Minister : मंत्रिपदी बढती, सुरु झाली झाडाझडती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Embed widget