Andheri By polls Result 2022: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाची 'लिटमस टेस्ट', कमी मतदानामुळे ठकरेंच्या चिंतेत वाढ?
Andheri By polls Result 2022: ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित मानला जात असतानाच आता या निवडणुकीत मतदानाच्या आधी पडद्यामागून 'नोटा' ला मत टाका असा जोरदार प्रचार झाल्याची चर्चा आहे
Andheri East By Election Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. पण त्याआधीच या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या निवडणुकीची चर्चा थंडावली होती पण मतदानाची टक्केवारी आणि पडद्यामागे घडलेल्या घडामोडी यामुळे या निवडणुकीचा निकाल धक्कादायक होऊ शकतो का अशी चर्चा सुरू झालीय
'166 अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आवाहनानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंसह सहा उमेदवार रिंगणात आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी 31.74% मतदान झाले. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच पारड जड असलं तरी काही अनपेक्षित निकाल ही लागण्याची चर्चा सध्या सुरू आहे.
166 - अंधेरी पूर्व' विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 31.74 टक्के मतदान झाले. 2 लाख 7 हजार 502 मतदारांपैकी 84 हजार 166 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंसह सहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत पडद्यामागून 'नोटा'ला मत टाका, असा प्रचार केला गेला आणि नोटाला काही मत मिळू शकतात याची चर्चा सध्या निकालापूर्वी जोरदार सुरू आहे. तसेच जिंकणाऱ्या उमेदवाराप्रमाणे नोटाला देखील अधिक मत पडतील अशी देखील चर्चा रंगली आहे.
2019 च्या अंधेरी निवडणुकीची आकडेवारी
2019 च्या निवडणुकीत एकूण 53.55 टक्के मतदान झालं होतं. यात एकूण मतदानापैकी 42.67 टक्के मतदान दिवंगत रमेश लटके यांना मिळालं होतं तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुरजी पटेल यांना 31.74 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या अमीन शेट्टी यांना 19 टक्के मत मिळाली होती यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ऋतुजा लटके या प्रमुख पक्षाच्या उमेदवार आहेत. भाजपने माघार घेतली आहे तर काँग्रेसने लटके यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर इतर दुसरा अपक्ष देखील ऋतुजा लटके यांना आव्हान देण्याइतका ताकदवान नाहीये. त्यामुळे जरी ऋतुजा लटके यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नोटाचा वापर झाला किंवा नोटा पर्यायाला लटकेंपेक्षा जास्त मतं मिळाली तरीही त्यांचा विजय होऊ शकतो असे जाणकार सांगतात.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाला काहीच तास शिल्लक आहेत. त्यात या निकालामध्ये ऋतुजा लटके यांना 41 हजार, नोटाला 43 हजार आणि अपक्षांना सात हजाराच्या आसपास मतं मिळण्याच शकयता असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर पोस्ट देखील फिरत आहेत. मतदानापूर्वीच हा सर्व्हे खोटा असल्याचं ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी खुलासा केला आहे. मात्र निकालापूर्वी पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगल्याने निकाल कोणाच्या बाजूने लागतोय हे प्रत्यक्ष निकाल समोर आल्यावरच स्पष्ट होईल.