Amol Mitkari: 'अजितदादा सोबत आले नसते तर 100 जागा', गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा मिटकरींकडून समाचार, म्हणाले, 'जुलाबराव होऊ...'
Amol Mitkari on Gulabrao Patil Statement: गुलाबराव पाटलांचा गोड गैरसमज आहे. अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते? हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्याने माहिती आहे, असं म्हणत मिटकरींनी समाचार घेतला आहे.
Gulabrao Patil on Ajit Pawar : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. आत्तापर्यंत सर्वकाही आलबेल होतं. मात्र, आता मित्रपक्षातील धुसफूस दिसू लागली आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी आता एकमेकांना प्रत्युत्तर द्यायला सुरूवात झाली असून शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते आमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात जुंपल्याचं दिसून येत आहे. 'अजितदादा आमच्यामध्ये आले नसते, तर 100 जागा आल्या असत्या, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं त्यावर मिटकरींची स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.
गुलाबराव पाटलांचा (Gulabrao Patil) गोड गैरसमज आहे. अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते? हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्याने माहिती आहे. असं म्हणत गुलाबरावांनी गुलाबराव सारख राहावं त्यांनी जुलाबराव होऊ नये, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणालेत अमोल मिटकरी?
गुलाबराव पाटलांचा गोड गैरसमज आहे. अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते? हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्याने माहिती आहे. असं म्हणत गुलाबरावांनी गुलाबराव सारख राहावं त्यांनी जुलाबराव होऊ नये, अशी माझी त्यांना विनंती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बोलणारे जास्त नाहीयेत आधी रामदास कदम बोलून गेले, आता गुलाबराव पाटील बोलून गेले मला असं मला कळत नाही का अचानक उफाळून येतं. एकत्र विधानसभा लढलो, जिंकलो. आता एकत्रित आला पाहिजे. शेवटी अजित पवार यांनी घेतलेली मेहनत आणि तिन्ही पक्षांनी घेतलेली मेहनत आम्ही नाकारत नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार या तिघांचीही मेहनत आम्ही नाकारत नाही. तिघांनी मिळून राज्यात महायुतीची सत्ता आणल्यानंतर आता अशा प्रकारचे वक्तव्य करून मला वाटतं महायुतीमध्ये जाणीवपूर्वक रामदास कदम किंवा गुलाबराव पाटील हे जाणीवपूर्वक अजित पवार यांना टार्गेट करून उत्कृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुलाबराव पाटलांनी समजून घ्यावं त्यांनी गुलाबासारखं राहावं. आता तुमचा सुगंध जरा कमी झालेला दिसतोय. मंत्रीपदी वर्णी लागते की नाही याबद्दल शंका आहे. गुलाबराव गुलाबराव राहा जुलाबराव होऊ नका एवढेच माझं म्हणणं आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
विधानसभेला (Vidhansabha) आम्ही केवळ 85 जागा लढलो होतो. कदाचित अजितदादा आमच्यामध्ये आले नसते तर त्या जागा आम्हाला मिळाल्या असत्या. त्यामुळं आमच्या 90 ते 100 जागा आल्या असत्या असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटलं. अजित पवारांना घेतल्यानंतरही आमच्या नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कधी म्हटलं नाही की यांना का घेतले. असा आमचा नेता असल्याचे पाटील म्हणाले. कोणी काहीही म्हणत असेल तर त्यात काही तथ्य नाही असंही गुलबाराव पाटील म्हणाले.