एक्स्प्लोर

Amit Thackeray: शिवाजी पार्कवर कोणाची सभा होणार? दोन्ही ठाकरे बंधूंचा अर्ज; अमित ठाकरे म्हणाले, मैदान मिळेल त्याला...

Amit Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पाच मजली इमारतीमध्ये लिफ्ट नाहीय. पार्किंगचा खूप मोठा विषय आहे, असं अमित ठाकरे म्हणाले. 

Amit Thackeray On Mahim Vidhan Sabha Election: आम्ही दर आठवड्याला समुद्रकिनारा स्वच्छ करतो. तुम्ही त्याच-त्याच लोकांना निवडता, त्यामुळे तेच तेच प्रश्न पुन्हा दिसतात. तुम्ही राज ठाकरेंना निवडा, मग तुमच्याकडे प्रश्न उरणार नाहीत, असं अमित ठाकरे (Amit Thackeray) एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. समुद्र किनारा साफ करणे, हे माझे मोठे व्हिजन आहे. यामुळे उद्योग निर्माण होईल. फुडट्रॅक, वॉटर स्पोर्ट आपण दादर-माहीम समुद्र किनाऱ्यावर करू शकतो, असं अमित ठाकरेंनी सांगितले. 

अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले की, लोकांचे खूप साधारण प्रश्न आहेत. पण त्यांच्याकडे कोण बघत नाही. त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले तर लगेच सुटतील. तसेच मला वाईट या गोष्टीच वाटतं की माझी आई जेव्हा फिरत होती. तेव्हा नागरिकांनी तिला असे सांगितले की आमच्या घरी आज पाणी आले नाही, म्हणून आंघोळ करु शकलो नाही. पाच मजली इमारतीमध्ये लिफ्ट नाहीय. पार्किंगचा खूप मोठा विषय आहे, असं अमित ठाकरे म्हणाले. 

लोक खूप आश्वासने देतात पण किती पूर्ण होतात ते तुम्ही पाहिले आहे. पण आमचा जो जाहीरनामा असेल तो पुढील 5 वर्षात झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. या वर्षी लोकांना नक्की बदल बघायला मिळेल, असंही अमित ठाकरेंनी सांगितले. अमित ठाकरेंनी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील सभेवर देखील भाष्य केलं आहे. एकाच दिवशी जाहीर सभेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला आहे. यावर हा तांत्रिक विषय आहे की कोणाला परवानगी मिळेल. ज्याला मिळेल मैदान ते मिळेल, पण आमची तयारी 100 टक्के पूर्ण आहे, असं अमित ठाकरे म्हणाले. 

शिवाजी पार्क मैदानासाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना दोघेही आग्रही-

17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान सभेला मिळावे यासाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना दोघेही आग्रही आहेत. 18 नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होत असल्याने, 17 नोव्हेंबर ची रात्रीची शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानावर व्हावी, असा दोन्हीही ठाकरेंचा आग्रह असल्याची माहिती समोर आली आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी  इतर राजकीय पक्षास सहभाग घेण्यास परवानगी दिल्यास संघर्ष उद्भवू शकतो, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी असं शिवसेना ठाकरे गटाने महापालिका निवडणूक आयोगाकडे म्हटलं आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने हजारो शिवसैनिक स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मनसेला  परवानगी मिळाल्यास कुठलीही संघर्षाची ठिणगी पडू नये, यासाठी  शिवाजी पार्कवर सभा  घेण्याची परवानगी मिळावी, अशी उद्धव ठाकरे यांची  मागणी आहे. तर माहीम विधानसभा मतदारसंघात  राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे उमेदवार असल्याने 17 नोव्हेंबरला स्वतः राज ठाकरे अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याचं त्यांनी ठरवलं आहे.  

संबंधित बातमी:

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!

महत्त्वाच्या बातम्या

Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget