एक्स्प्लोर

सदा सरवणकरांनी शेवटच्या दिवशी मोठा गेम खेळला, राजकीय नाट्याचा फोकस स्वत:वर ठेवत मास्टरस्ट्रोक मारला

Amit Thackeray Sada Sarvankar: गेल्या अनेक दिवसांपासून सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत सतत चर्चा रंगल्या होत्या.

Amit Thackeray: मुंबईतील माहीम विधानसभेत आता तिरंगी लढत निश्चित झाली आहे. मनसेचे अमित ठाकरे (Amit Thackeray), शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत (Mahesh Sawant) हे एकमेकांना भिडणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने आता माहीम मतदारसंघात जबरदस्त ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत सतत चर्चा रंगल्या होत्या. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र काल सकाळपासून सदा सरवणकर अनेकांच्या भेटीगाठी घेत होते. त्यानंतर जवळपास दुपारी 2 नंतर ते राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी रवाना झाले. मात्र राज ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली. मात्र याआधी सदा सरवणकर माध्यमांशी बोलताना अनेकदा मनसेने आपले उमेदवार मागे घ्यावेत, अशी मागणी करताना दिसले. 

सदा सरवणकरांनी शेवटच्या दिवशी मोठा गेम खेळला-

अमित ठाकरे माहीम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने हा मतदारसंघ जास्त चर्चेत आला. माध्यमांचं देखील सतत या मतदारसंघाकडे लक्ष होतं. समाधान सरवणकर, सदा सरवणकर सतत माध्यमांशी संवाद साधत होते. तसेच मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असा दावाही सतत करण्यात येत होता. राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाण्याआधी देखील सदा सरवणकर सतत माध्यमांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. सकाळपासून-दुपारपर्यंत सदा सरवणकर माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. मनसेने महायुतीविरोधात जे उमेदवार उभे केले आहेत, ते मागे घ्यावे...त्यानंतर मी माहीममधून माघार घेतो, असं सदा सरवणकर म्हणत होते. सदा सरवणकर हे ज्या क्षणाला म्हणाले, त्याच क्षणाला त्यांचा इरादा स्पष्ट झाला होता. त्यानंतर काल दिवसभर मिडिया कव्हरेज आणि स्वत:वर फोकस ठेवताना सदा सरवणकर दिसून आले. 

नेमकं काय घडलं?

माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि सदा सरवणकर काल राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. पण राज ठाकरेंनी भेट नाकारल्याचं दिसून आलं. याबाबत माहिती देताना सदा सरवणकर म्हणाले की, माझा मुलगा आणि माझे चार पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत. ते आपल्याला भेटू इच्छितात. आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात. त्यावर मला काही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायचे असेल तर घ्या, नाहीतर लढा, असं राज ठाकरेंनी निरोप पाठवला. त्यामुळे कुठलही त्यापुढचं बोलणं झालं नाही. राज ठाकरेंनी भेट सुद्धा नाकारली, असं सदा सरवणकर यांनी सांगितले. 

भाजपची साथ कुणाला?

भाजपच्या आशिष शेलारांनी आपण अमित ठाकरेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु असं म्हटलंय. तर नारायण राणेंनी महायुतीच्या उमेदवारालाच निवडून आणू असं सांगितलंय. त्यामुळं माहीममध्ये काय होणार? भाजप अधिकृतरित्या कोणाला पाठिंबा देणार? भाजपचे नेते नेमकं कोणाच्या प्रचारसभेत दिसणार? हेच पाहावं लागणार आहे. 

संबंधित बातमी:

Sada Sarvankar On Amit Thackeray: मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार, पण...; सदा सरवणकरांनी ठेवली एक अट, माहीममध्ये काय होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget