एक्स्प्लोर

Amit Shah : अमित शाह तडकाफडकी दिल्लीला रवाना; विदर्भातील सर्व नियोजित सभा रद्द! नेमकं कारण काय?

Amit Shah : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या नियोजित असलेल्या चारही सभांना गैरहजर असणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे 3 दिवस उरले आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रंग चढला असून आता प्रचाराला अवघा काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असे असताना भाजपच्या गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहे. निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात अनेक दिग्गज नेते विदर्भावर फोकस करत असल्याचे दिसून आले. अशातच अमित शाह हे सध्या विदर्भाच्या दोऱ्यांवर असून त्यांच्या आज चार सभा होणार होत्या. मात्र ऐन वेळेवर विदर्भातील सर्व नियोजित सभांना अमित शाहांची गैरहजेरी राहणार आल्याची माहिती पुढे आली आहे.

अमित शाह यांच्या विदर्भातील सर्व नियोजित सभा रद्द!

अमित शाह  यांच्या नियोजित असलेल्या चारही सभा रद्द करून ते तातडीने नागपुरातून दिल्लीसाठी निघाले आहे. आजच्या चार सभांसाठी अमित शाह  काल संध्याकाळीच नागपुरात दाखल झाले होते. त्यांची आज गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काटोलसह सावनेर अशा चार सभा होणार होत्या. या सर्व सभा रद्द करून अमित शाह दिल्लीसाठी रवाना झाले आहे. मात्र या सर्व महत्वाच्या सभा रद्द करून अमित शाहांच्या तडकाफडकी दिल्लीवारी मागील कारण अद्याप समजलेले नाहीये. आजच्या चार सभांसाठी अमित शाहा काल संध्याकाळीच नागपुरात दाखल झाले होते. त्यांचा नागपूरातील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम होता. तर आज (रविवारी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते सभेसाठी गडचिरोलीला रवाना होणार होते. मात्र आता हा दौरा रद्द झाल्याचा समजतंय. दरम्यान, अमित शाह यांच्या नियोजित असलेल्या चारही सभांना आज स्मृती इराणी संबोधित करतील, असेही सांगण्यात येतंय.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा असा होत्या नियोजित सभा  

दुपारी १२.०० - गडचिरोली शहर

दुपारी १.०० - वर्धा शहर

दुपारी ३.०० - काटोल, नागपूर ग्रामीण

दुपारी ४.०० - सावनेर

संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा रोड शो

 काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आज (रविवार) नागपुरात एकानंतर एक असे दोन रोड-शो करणार आहेत. प्रियंका गांधी यांचा पहिला रोड-शो पश्चिम नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या प्रचारासाठी होईल. तर दुपारी अडीच वाजता अवस्थी नगर चौकातून सुरू होणारा हा रोड शो दिनशॉ फॅक्टरी चौक जवळ संपुष्टात येईल. प्रियंका गांधींचा दुसरा रोड-शो मध्ये नागपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी होईल. गांधीगेट पासून सुरू होणारा रोड-शो संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बडकस चौकावर जाऊन पूर्ण होईल. त्यामुळे या दुसऱ्या रोड शोच्या माध्यमातून प्रियांका गांधी संघाच्या बालेकिल्लापर्यंत जातील हे विशेष आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
×
Embed widget